संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 6-हिंदुस्थानच्या इतिहासात अजरामर झालेल्या आणि आक्रमक मोहम्मद गझनवी याला तब्बल 17 लढ्यात पराभूत करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या जीवनावर आधारित पृथ्वीराज हा चित्रपट नुकताच 3 जून ला कामठी च्या गोयल टॉकीज मध्ये प्रदर्शित झाला असून हा चित्रपट करमुक्त (टॅक्स फ्री) करण्याची मागणी समाजसेवक मुकेश चकोले यांनी केली आहे.
महाराज पृथ्वीराज चौहान हे भारतीय इतिहासातील एक अविस्मरणोय नाव आहे. आपल्या मुसद्दी आणि कर्तबगारीने त्यांनी त्यांचे साम्राज्य वाढविले होते.चौहान घराण्यात जन्मलेले पृथ्वीराज वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी त्यांनी वडिलांच्या निधनानंतर दिल्ली आणि अजमेरची सत्ता हाती घेतली ती अनेक मर्यादेपर्यंत पसरवली होती पण शेवटी ते राजकारणाचे बळी ठरले आणि त्यांचे संस्थान गमावले .पृथ्वीराजांना राय पिथोरा म्हणूनही ओळखले जात असे.पृथ्वीराज चव्हाण हे लहानपणापासूनच कुशल योद्धा होते , त्यांनी युद्धाचे अनेक गुण शिकले होते .शब्दभेदी बाण विद्या त्यांनी लहानपणापासूनच पाळली होती .महाराज पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद घोरी व इतर जुलमी शासक यांच्या सोबत लढून आपले साम्राज्य वाढविले अशा या महान राजा च्या जीवनावर आधारित ‘पृथ्वीराज’ चित्रपट हा टॅक्स फ्री करण्यात यावा अशी मागणी मुकेश चकोले यांनी केले आहे.
पृथ्वीराज चित्रपट करमुक्त करा-मुकेश चकोले
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com