संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-34 पैकी 17 जागा महिलांसाठी राखीव
-द्विसदस्य प्रभाग पद्धतीने होणार निवडणूक
-ओबीसी आरक्षणाशिवाय होणार निवडणूक प्रक्रिया
कामठी ता प्र 13 – कामठी नगर परिषद च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महिला प्रवर्गातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण महिलासाठी राखीव असलेल्या अशा एकूण 17 जागांचे आरक्षण सोडत आज कामठी नगर परिषद चे प्रशासक व उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर व मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या मुख्य उपस्थितीत तहसील कार्यालय सभागृहात सकाळी 11 वाजता काढण्यात आली आहे.यामध्ये महिलांसाठी 50 टक्के जागेची राखीव आरक्षणानुसार सोडत प्रक्रिया पार पडली.
17 प्रभागातील एकूण 34 सदस्य पैकी 17 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या असून सर्वसाधारण प्रवर्गातील जागांवर सुदधा महिलांना निवडणूक लढवता येणार आहे.त्यामुळे नगरपालिकेत महिलाराज येण्याची शक्यता आहे. यावर्षी ओबीसी आरक्षणाशिवाय कामठी नगरपालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले असून दोन चा एक प्रभाग आहे तर यावर्षी एक प्रभाग वाढल्याने दोन सदस्यांत वाढ होऊन एकूण सदस्यांची संख्या 34 होणार आहे.34 पैकी आरक्षित असलेल्या 50 टक्केनुसार 17 जागेसाठी कामठी नगर पालिकेने आरक्षण जाहीर केले.
यानुसार अनुसूचित जाती साठी राखीव असलेल्या 10 प्रभागमध्ये प्रभाग क्र 3, 4 ,9, 10, 12, 13,14,15, 16, 17चा समाव
बॉक्स-उर्वरीत जागेवर पुरुषांना संधी
—महिलांचे आरक्षण वगळता उर्वरित सर्व जागेवर पुरुषांना निवडणूक लढता येणार आहे.यावेळी महिला प्रवर्गातून एस सी प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या 10 पैकी 5 जागा अनुसूचित जाती महिलासाठी ईश्वरचीठीचा उपयोग करून काढण्यात आले यामध्ये अनुसूचित जातो महिला प्रवर्गासाठी प्रभाग क्र 3, 9, 15, 16, 17 आरक्षित करण्यात आले तर उर्वरित 5 प्रभाग हे अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले ज्यामध्ये प्रभाग क्र 4, 10, 12, 13, 14 चा समावेश आहे.
या प्रभागातून एस सी महिला वा पुरुष उमेदवार असू शकतात, अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्र 5 राखीव ठेवण्यात आला यामध्ये दोन जागेपैकी एक जागा अनुसूचित जमाती सर्वसाधारण व दुसरी जागा अनुसुचित जमाती सर्वसाधारण महिला साठी राखीव करण्यात आले. तर जाहीर आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्र 1 (अ)मध्ये सर्वसाधारण महिला, (ब्)सर्वसाधारण,प्रभाग क्र 2 (अ) सर्वसाधारण महिला, (ब्)सर्वसाधारण, प्रभाग क्र 3 (अ)अनुसूचित जाती महिला,(ब्)सर्वसाधारण, प्रभाग क्र 4(अ)अनुसूचित जाती, (ब्)सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र 5 (अ)अनुसूचित जमाती (ब्)अनुसूचित जमाती सर्वसाधारण महिला), प्रभाग क्र 6(अ)सर्वसाधारण महिला (ब्)सर्वसाधारण, प्रभाग क्र 7(अ)सर्वसाधारण महिला (ब्)सर्वसाधारण, प्रभाग क्र 8 (अ)सर्वसाधारण महिला (ब्)सर्वसाधारण,प्रभाग क्र 9 (अ)अनुसूचित जाती महिला, (ब्)सर्वसाधारण, प्रभाग क्र 10 (अ)अनुसूचित जातो,(ब्)सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र 11 (अ)सर्वसाधारण महिला, (ब्)सर्वसाधारण, प्रभाग क्र 12(अ)अनुसूचित जाती,(ब्)सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र 13(अ)अनुसूचित जातो, (ब्)सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र 14(अ)अनुसूचित जाती, (ब्)सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र 15(अ)अनुसूचित जाती महिला(ब्)सर्वसाधारण,प्रभाग क्र 16 (अ)अनुसूचित जाती महिला ,(ब्)सर्वसाधारण , प्रभाग क्र 17 (अ)अनुसूचित जातो महिला,(ब्)सर्वसाधारण प्रवर्ग निश्चित करण्यात आले.
या आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती वा सूचना असल्यास त्या 15 ते 21 जून या कालावधीत दाखल करता येतील.29 जून ला संबंधित अधिकारी सदस्यपदाच्या आरक्षणास मान्यता देणार असून आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
आजच्या या आरक्षण सोडत सभेला भाजप चे शहराध्यक्ष संजय कनोजिया, उज्वल रायबोले,सतिश जैस्वाल, प्रमोद वर्णम, बरीएम चे विदर्भ महासचिव अजय कदम, सुभाष सोमकुवर, उदास बन्सोड, सावला सिंगाडे, कांग्रेस चे काशीनाथ प्रधान, इर्शाद शेख, गुड्डू मांनवटकर , ममता कांबळे , आकाश भोकरे, बसपा चे नागसेन गजभिये, वंचित बहुजन आघाडी चे शहराध्यक्ष दीपक वासनिक, प्रशांत नगरकर, वाघमारे आदी माजी नगरसेवक गण उपस्थित होते .