महिला दिनी भाजपाद्वारे आरोग्य मातृशक्ती पुरस्कार प्रदान

भाजपा वैद्यकीय आघाडीचे आयोजन…
नागपुर – स्वप्न भाजपाचे, मातृशक्तींच्या उत्तम आरोग्याचे ! हे ब्रीद साकारताना भाजपा वैद्यकीय आघाडी, नागपूर महानगर द्वारा जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य क्षेत्रात ईश्वरीय सेवाकार्य करणाऱ्या युवा नारीशक्तींना  आरोग्य मातृशक्ती पुरस्कार भाजप शहर अध्यक्ष आमदार प्रवीणजी दटके यांच्या मार्गदर्शनात व राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ विकासजी महात्मे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात लाईफस्टाईल दिसोर्डर तज्ञ डॉ मीनल वैरागडे, दंतरोग तज्ञ  डॉ देविकानी गिरीपुंजे, आयुर्वेद पंचकर्मतज्ञ डॉ नम्रता गुप्ता, होमिओतज्ञ डॉ जिगना पुण्यानी आदी युवा डॉक्टर्स ला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. .याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार कृष्णाजी खोपडे, मंडळ अध्यक्ष संजयजी अवचट,महिला मोर्चा अध्यक्ष सौ नीताताई ठाकरे,नगरसेवक बंटीजी कुकडे,वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ गिरीश चरडे,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजप वैद्यकीय आघाडी नागपूर महानगरचे *महामंत्री आयुर्वेद तज्ञ डॉ श्रीरंग वराडपांडे, डॉ कोमल काशीकर, सुप्रसिद्ध होमिओतज्ञ डॉ रवी वैरागडे, डॉ अलका मुखर्जी, डॉ रश्मी शुक्ला, आदी डॉक्टर्स नी महिलांना संबोधन केले
या वेळी भाजपा वैद्यकीय आघाडी नागपूर महानगर मध्ये नवनिर्वाचित वैद्यकीय आघाडीचे उपाध्यक्ष म्हणून डॉ रवी वैरागडे यांचा डॉ महात्मेच्या हस्ते निवड करण्यात आली.शिबिरात 200 हुन अधिक महिलांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन डॉ श्रीरंग वराडपांडे तर आभार डॉ रवी वैरागडे यांनी मानले.याप्रसंगी डॉ छाया दुरुगकर, डॉ प्रांजल मोरघडे, डॉ प्रांजल मोरघडे,डॉ तृप्ती मत्ते, आदी भाजपाचे  पदाधिकारी उपस्थिती होते.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ग्रामपंचायत केम येथे बांधकाम कामगारांना सुरक्षा रक्षा पेटी व कार्ड वाटप संपन्न

Thu Mar 10 , 2022
– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 10:- ग्रामपंचायत केम येथे जि प सदस्य व सत्ता पक्षनेता जिल्हा परिषद प्रा. अवंतिका ताई लेकुरवाळे व पंचायत समिती कामठीचे उपसभापती आशिष मल्लेवार यांच्या मार्गदर्शनात तसेच केम ग्रा प उपसरपंच *अतुल बाळबुधे* यांच्या विशेष प्रयत्नाने बांधकाम कामगार यांना बांधकाम सुरक्षा योजनेअंतर्गत योजनेचा लाभ कामगारांना मिळावा याकरिता गावातील 22 कामगारांना सुरक्षा रक्षा कीट व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!