– विदर्भातील 6,250 ग्राहकांचे आयुष्य उजळले
नागपूर :- दिवाळीच्या प्रकाशपर्वात नागरिकांच्या घरासोबत त्यांचे आयुश्य देखील प्रकाशमान व्हावे यासाठी महावितरणतर्फ़े राबविण्यात आलेल्या ‘हर घर दिया, हर घर दिवाली’ या संकल्पने अंतर्गत विदर्भातील तब्बल 6,250 ग्राहकांना नवीन वीज जोडणी देत त्यांचे आयुष्य प्रकाशमय केले आहे.
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या या विशेष मोहीमेत विदर्भातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील 6,250 ग्राहकांना नवीन वीज जोडणी देत त्यांची दिवाळी गोड केली आहे. यात सर्वाधिक नागपूर जिल्ह्यातील 1,268, बुलढाणा जिल्ह्यातील 1,214 तर त्याखालोखाल गडचिरोली जिल्ह्यातील 704, अमरावती जिल्ह्यातील 673, अकोला जिल्ह्यातील 548, चंद्रपूर जिल्ह्यातील 525, वाशिम जिल्ह्यातील 337, यवतमाळ जिल्ह्यातील 326, भंडारा जिल्ह्यातील 266, वर्धा जिल्ह्यातील 219 तर गोंदिया जिल्ह्यातील 181 ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली. यात पायाभुत सुविधा उपलब्ध नसलेल्या 248 ग्राहकांकडे त्या सुविधा उपलब्ध करून देत तर पायाभुत सुविधा उपलब्ध असलेल्या 6,002 ग्राहकांना वीज जोडणी देत त्यांना प्रकाश देण्याचे महत्वपुर्ण काम महावितरणने अवघ्या 10 दिवसात केले आहे.
महावितरणकडे नवीन वीज जोडणीचे अर्ज करुन आवश्यक शुल्काचा भरणा केलेल्या ग्राहकांची दिवाळी प्रकाशमय व्हावी, त्यांना अंधारात राहावे लागू नये यासाठी प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी 25 ऑक्टोंबर रोजी मांडलेल्या ‘हर घर दिया, हर घर दिवाली’ या संकल्पनेला अनुकुल प्रतिसाद देत 25 ऑक्टोंबर पासून राबविण्यात आलेल्या या संकल्पनेला मुर्त स्वरुप देण्यासाठी विदर्भातील सर्व अभियंत्यांनी विशेष परिश्रम घेत, ज्या ग्राहकांकडे वीज जोडणीसाठी आवश्यक असलेल्या पायाभुत सुविधा उपलब्ध नाहीत अश्या ग्राहकांकडे त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या यात सर्वाधिक 40 वीज जोडण्या खामगाव विभागात तर नागपूर येथील सिव्हील लाईन्स विभागाने 30 ग्राहकांकडे पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देत तेथे नवीन वीज जोडणी उपलब्ध करुन दिली. अकोला ग्रामीण विभागाने सर्वाधिक तब्बल 359 विज जोडण्या दिल्या, वाशिम विभागाने 337, कॉग्रेसनगर विभागाने 253 तर बुटीबोरी विभागाने 248 नवीन वीज जोडण्या दिल्या.
या 6,250 नवीन वीज जोडण्यांमध्ये 5,479 घरगुती, 593 वाणिज्यीक, 62 औद्योगिक तर 136 इतर वर्गवारीतीअ ग्राहकांचा समावेश असून नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करुन आवश्यक शुल्का भरणा केलेल्या प्रत्येक ग्राहकाला त्वरीत वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यास महावितरण कटिबद्ध असल्याने महावितरणतर्फ़े स्पष्ट करण्यात आले आहे.
-उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,महावितरण, नागपूर