नागपूर :– आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फ़े त्यांना अभिवादन करण्यात आले.महावितरणच्या विद्युत भवन कार्यालयात प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस माल्यार्पन कित अभिवादन केले.
याप्रसंगी अधीक्षक अभियंता हरिश गजबे व मंगेश वैद्य,महाव्यवस्थापक (वित्त ) अतुल राऊत, उप महाव्यवस्थापक (मान संसाधन) प्रमोद खुळे, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे,सहायक महाव्यवस्थापक प्रदिप सातपुते, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे, प्रणाली विश्लेषक प्रविण काटोले यांच्यासह अधिकारी, अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.