संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- वाढत्या विद्दूत चोरीवर आळा घालण्यासाठी महावितरण तर्फे सर्वत्र भूमिगत विज वाहिनी चा वापर करण्यात आला असला तरी अजूनही वीज चोरीला पूर्णता आळा बसलेला नाही त्यातच पूर्वीच्या तुलनेत आताच्या येणाऱ्या दरमहा वीज पुरवठा देयक मध्ये नोंदविलेले एकूण वापर रिडींग युनिट ची संख्या ही मर्यादा पलीकडेच असते.पण नाईलाजस्तव ते स्वीकारावे लागते .त्यातच महावितरण कंपनीने विद्दूत युनिट दरवाढ केल्याने मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात भरमसाठ विज बिल ग्राहकांना येत असल्याने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहेत.
वीज ग्राहकांची दिवसेंदिवस लूटमार सुरू असून ग्राहकांच्या वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे वीज बिल भरता भरता दमछाक होते तेव्हा अशा परिस्थितीत दरमहा 5 हजार रुपये कमावणाऱ्या व्यक्तीने घराचा उदरनिर्वाह कसा करावा?असा प्रश्न उभा होऊन ठाकला आहे.
जर प्रत्येक युनिट ला दिल्लीमध्ये ,हरियाणा,हिमाचल प्रदेश यासारख्या इतरही राज्यात वीज दर युनिटला तीन रूपयाच्या आत वीज दर आकारला जातो आणि महाराष्ट्रात त्यापेक्षा तिपटीने युनिट वीज दर आकारला जातो तर महाराष्ट्रातील वीज ही सोन्याच्या तारामधून पुरविली जाते काय?असा प्रश्न येथील जागरूक नागरिक करीत आहेत.
नागपूर पासून हाकेच्या अनंतराव असलेल्या कामठी जवळच कोराडी,खापरखेडा वीज निर्मिती औष्णिक विद्दूत केंद्र आहेत इथूनच सर्वत्र वीज पुरवठा केला जातो त्यातुलणेत वीज युनिट दर कमी अपेक्षित होते मात्र तसे होताना दिसत नाही. सद्यस्थितीत कामठी शहराचा विचार केला असता 0 ते 100 पर्यंत युनिट वीज आकार 4.41 रुपये,101-300 पर्यंत 9.64 रुपये,301-500पर्यंत 13.61रुपये,501ते 1000 पर्यंत 15-57रुपये आकारला जातो .त्यातच स्थिर आकार मध्ये दिवसेंदिवस भरमसाठ वाढ होताना दिसत आहे.2015 साली स्थिर आकार 40 रुपये होता तो आता आठ वर्षात 116 वर गेला त्यात तिप्पट वाढ झाली आहे.यामध्ये दरवर्षी मीटर भाड्यांची अतिरिक्त रक्कमही वीज ग्राहकांना भरावी लागत आहे. आजच्या स्थितीत दिवसाला 300 रुपये कमवणे अवघड झाले आहे तसेच 6 हजार रुपये कमावणाऱ्या सर्वसामान्य माणसाला उदारनिर्वाह करणे कठीण झाले आहे .महावितरण कडून दिवसेंदिवस वीज बिले वाढवीत असल्याने उदरनिर्वाहासह वीज बिलाचे नियोजन बीघडले आहे त्यातच लोकप्रतिनिधी आपापल्या राजकारनात खुर्चीसाठी गुंतले असून त्यांना जनतेचे काही देणे घेणें नाही त्यासाठी जनतेनेच एकत्र येऊन आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
-वीज ग्राहकांचा सोलर वीज जोडणीकडे लक्ष
-भरमसाठ वीज बिलाना कंटाळून अनेक ग्राहकानी सोलर वीज जोडणीकडे कल वाढवला आहे.सोलरमधुन विद्दूत विभागाकडे जाणारे कित्येक ग्राहकांचे हजारो युनिट विद्दूत वितरणच्या बँकेत जमा आहेत.पण ग्राहकांना या जमा युनिटचा एकही मोबदला महावितरण कडून मिळत नाही .आपल्या एका युनिटचा पैसा विद्दूत विभाग ग्राहकाकडे सोडत नाही मग सोलरच्या जमा युनिटची परतफेड ग्राहकांना का दिली जात नाही असा सवाल येथील जागरूक नागरिक करीत आहेत.