संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-पुज्यनिय भिक्षु संघाच्या उपस्थितीत महापरित्रांण पाठ,व धम्मदेसना संपन्न
कामठी :- स्मूर्तीशेष महादाननायिका मॅडम नोरिको ओगावा यांच्या पाचव्या स्मूर्तिदिनानिमित्त आज सोमवार 2 सप्टेंबर ला सकाळी 10 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुज्यनिय भिक्षु संघाच्या उपस्थितीत महापरित्राण पाठ ,धम्मदेसना कार्यक्रम शेकडो बौद्ध उपासक उपसिकांच्या उपस्थितीत धम्ममय वातावरणात संपन्न झाले.
मॅडम नोरिको ओगावा यांच्या पाचव्या स्मूर्तिदिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पूज्य भिक्खु संघाच्या वतीने सर्वप्रथम ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथिल तथागत गौतम बुद्धांच्या मूर्ती समोर मेणबत्ती व उदबत्ती लावून वंदना घेण्यात आली.तसेच मॅडम नोरिको ओगावा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भिक्खू संघातर्फे मॅडम नोरिको ओगावा यांना आदरांजली वाहण्यात आली याप्रसंगी ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी जपानी पद्धतीने चॅटिंग करून मॅडम नोरिको ओगावा यांना आदरांजली वाहली.
या कार्यक्रमाला येथील पूज्य भदंत ज्ञानज्योति महाथेरो (रामदेगी-चंद्रपूर),दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य पूज्य भदंत नागदीपणकर स्थविर, पूज्य भदंत प्रज्ञाज्योति महाथेरो, पूज्य भदंत डॉ मेत्तानंद महाथेरो,पूज्य भदंत बोधानंद महाथेरो,पूज्य भदंत ज्ञानबोधी महाथेरो, पूज्य भदंत डॉ सिलवन्स स्थविर,पूज्य भदंत ज्योतिबोधी,पूजत भदंत नंदमित्र, पूज्य भदंत सोबीता,पूज्य भदंत इंद्रज्योति,पूज्य भदंत केशी असलामा,पूज्य भदंत नंदमीत्र, पूज्य भदंत सुगता,पूज्य भदंत अगधम्मा,पूज्य भदंत कवीचिंदा व पूज्य भिक्षु संघ प्रामुख्याने उपस्थित होते.
पुज्यनिय भिक्खू संघाच्या वतीने महापरित्रांण पाठ व धम्मदेसना कार्यक्रम घेण्यात आले. पूज्य भदंत ज्ञानज्योति महाथेरो यांनी उपासक उपासिकांना धमदेसना दिली त्यामुळे संपूर्ण वातावरण धम्ममय झाले होते त्यानंतर ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या वतीने उपस्थित भिक्खू संघाला चिवरदान व भोजनदान देण्यात आले.
ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे आयोजित मॅडम नोरिको ओगावा यांच्या स्मूर्ति दिनानिमित्त मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते.याप्रसंगी ओगावा सोसायटी, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था,ड्रॅगन पॅलेस विप्सयना मेडिटेशन सेंटर, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल,ओगावा इंटरप्रायजेस प्रा ली यांच्या पदाधिकारी, शिक्षकवृंद, धम्मसेवक -धम्मसेविका व ड्रॅगन पॅलेस टेम्पल मैत्री संघाचे उपासक-उपसिका यांनी सुद्धा मॅडम नोरिको ओगावा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहली .