महाराष्ट्राची हरियाणात सुवर्ण-रौप्य लूट पाचव्या दिवशी तेरा पदके

मुंबई : हरियाणातील पंचकुला येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई सुरूच आहे. पाचव्या दिवशी पाच सुवर्णसहा रौप्य आणि दोन कांस्य पदके खेळाडूंनी पटकावली. त्यात बॅडमिंटनकुस्तीअॅथलेटिक्सकब्बडीसायकलिंग आदी क्रीडाप्रकारांचा समावेश आहे.

            ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राने आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. बॅडमिंटनमध्ये दर्शन पुजारीने तामीळनाडूच्या ऋत्विक संजीवला हरवले. कब्बडीत मुलांच्या संघाला सुवर्णपदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. त्यांचा हरियाणाकडून १९ गुणांनी पराभव झाला. मुलांच्या संघाला कांस्यपदक मिळाले.

            ट्रॅक सायकलिंगमध्ये केरीन प्रकारात मंगेश ताकमोगेने व मुलींमध्ये पूजा दानोळेने याच प्रकारात रौप्य पदके पटकावली.

            अॅथलेटिक्समध्ये उंच उडीत – अनिकेत माने (२.०७ मी.हरोलीकोल्हापूर) याने सुवर्ण पदक पटकावले. तर आर्यन पाटीलने (उत्तेखोलरायगड) याच प्रकारात (२.०४मी.) रौप्य जिंकले. सातारच्या सुदेष्णा शिवणकरने १०० मीटर धावण्यात सुवर्ण कमाई केली. मुलींमध्ये याच प्रकारात वडगाव शेरीच्या (पुणे) अवंतिका नरळेने रौप्य पदकावर नाव कोरले.

            कुस्तीत ५१ किलो फ्री स्टाईल – नरसिंग पाटील (सुवर्णकोल्हापूर)रोहित पाटील (रौप्यकोल्हापूर). या दोघांचीच शेवटची कुस्ती झाली.

            मुलींमध्ये ४९ किलो गटात अहिल्या शिंदेने कांस्य पदक जिंकले. ६५ किलो फ्रीस्टाईलमध्ये कोल्हापूरच्याच शुभम पाटीलने सुवर्ण पदक उंचावले. ७१ किलो गटात संकेत पाटीलने (कोल्हापूर) कांस्यची कमाई केली. एकंदरीत महाराष्ट्राच्या पैलवानांनी हरियानातील खेलो इंडियाचा आखाडा गाजवला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कोविडसंदर्भात शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनीच पालन करावे - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

Wed Jun 8 , 2022
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा कोविडचे रुग्ण वाढत आहेत ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.             राज्यात कोविडचे रुग्ण वाढत असल्याने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी सतर्क राहणे आवश्यक असून यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com