नागपूर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी शहरातील संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. त्यांचे हे विचार देशाला एकसंघ ठेवण्यास आणि समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची अंमलबजावणी करून त्यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेचे संरक्षण आपण सर्वांनी करूया, असे आवाहन कुणाल राऊत यांनी केले आहे. प्रसंगी शहरात विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित भोजनदान व सामाजीक, सांस्कृतीक कार्यक्रम स्थळी भेट दिली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसचे प्रभारी विजय सिंह राजू, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके, नागपुर शहर युवक कांग्रेसचे प्रभारी श्रीनिवास नालमवार, अजीत सिंग, पंकज सावरकर, नीलेश खोबरागडे, आकाश इंदुरकर, राकेश इखार सह नागरिक युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते