महाराष्ट्र राज्य लॉटरी नोव्हेंबर २०२४ चा भव्य सोडतीचा निकाल जाहीर

मुंबई :- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात.नोव्हेंबर २०२४ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून २८,९९२ तिकिटांना ३ कोटी २६ लाख ७० हजार ८५० रुपये व साप्ताहिक सोडतीतून ५६,७४१ तिकीटांना रू. दोन कोटी ३१ लाख ६३ हजार ९०० ची बक्षिस जाहीर झाली आहेत, असे महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी येथील वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक यांनी कळविले आहे.

१ नोव्हेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्र सह्याद्री, २ नोव्हेंबर, २०१४ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी, ६ नोव्हेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी दिवाळी विशेष, १२ डिसेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्र दिवाळी भव्यतम, १९ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र गजराज व दि. २०/११/२०२४ रोजी महाराष्ट्र गौरव या मासिक सोडती दुपारी ४.०० वाजता काढण्यात आल्या आहेत.

या लॉटरी तिकिटांना जाहीर झालेले बक्षीस:-

➡️ महाराष्ट्र सहयाद्री मालिका तिकीट क्रमांक MS-2411D/43098 या चिराग एन्टरप्रायझेस, नाशिक यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. ११ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

➡️महाराष्ट्र गणेशलक्ष्मी दिवाळी विशेष मालिका तिकीट क्रमांक GS-०६-३८६२ या महाराजा लॉटरी सेंटर, इचलकरंजी यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. २२ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

➡️ महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत तिकीट क्रमांक DI-05 / 38465 या न्यू जय अंबे लॉटरी भंडार, यवतमाळ यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. एक कोटीचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

➡️ महाराष्ट्र गजराज तिकीट क्रमांक GJ 24/7136 या न्यू जय अंबे लॉटरी भंडार, यवतमाळ यांच्याकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.14 लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे.

➡️महाराष्ट्र गौरव तिकिट क्रमांक G13/5771 या भारत लॉटरी, कोल्हापूर यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.35 लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहिर झाले आहे.

➡️ महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. सात लाखाचे प्रथम क्रमांकाचे एकूण 10 बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम. दहा हजारावरील वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. दहा हजाराच्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी येथील वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माध्यमांनी खातरजमा न करता कार्यकर्तृत्वाला कमी लेखू नये - संजय राठोड यांचे आवाहन

Fri Dec 13 , 2024
– मंत्रिमंडळात समावेश होवू नये म्हणून विरोधकांनी षडयंत्र रचल्याचा आरोप यवतमाळ :- दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री संजय राठोड यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून वृत्तवाहिन्यांवरून विविध आशयांच्या निराधार बातम्या पसरविल्या जात आहेत. याबाबत आमदार संजय राठोड यांनी प्रथमच मत व्यक्त करीत, ‘आपण कोणत्याही प्रगती पुस्तकात नापास झालो नाही’, असे स्पष्ट केले. माध्यमांनी कोणतीही खातरजमा न करता आपल्या विरोधात सुरू केलेला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com