नागपूर – वराहपालनातून अधिक फायदा मिळवण्यासाठी वराहपालकानी एकत्र येवून सहकारातून मांस प्रक्रिया उद्योगात उतरावे व स्वच्छ व सुरक्षित मांस उत्पादनाबरोबर मुल्यवर्धित मांसजन्य पदार्थ तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर चे कुलगुरू प्रा डॉ आशीश पातुरकर यानी केले . ते महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर , सेंटर फॉर पीपल्स कलेक्टिव व नागपूर शहर वराह पालन सहकारी संस्था मर्यादित नागपूर द्वारा “शास्त्रोक्त वराह पालन” या विषयावर कोविडचे नियम पाळून दि ७ जानेवारी रोजी आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. चर्चासत्राचे उद्घाटन सकाळच्या सत्रात माफसूचे संचालक विस्तार शिक्षण प्रा डॉ अनिल भिकाने यांचे हस्ते झाले. याप्रसंगी त्यानी वराहपालकाना विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संघटीत क्षेत्रात बदिंस्त वराह पालन व्यवसाय करून आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन केले. कार्यशाळेत डॉ. जी. पी. शेंडे यानी निवारा, दैनंदिन व्यवस्थापन व वराह च्या विविध जाती, डॉ. अतुल ढोक यांनी आहाराबाबत, माजी अधिष्ठाता डॉ. हेमंत बिराडे यांनी पुण्यावरून ऑनलाईन पद्धतीने वराह पालनातिल समस्या व संधी, प्रा डॉ. संदीप चौधरी यांनी वराहापासून मनुष्याला होणारे संसर्गजन्यआजार तर डॉ सरिपुत लांडगे यांनी वराह पालन करताना मार्केटिंग का आवश्यक आहे व ती कशाप्रकारे करावी यासंबंधी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत कोविडचे सर्व नियम पाळून ४० सदस्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ सारीपुत लांडगे , सुत्र संचालन डॉ आश्वीनी गायधनी तर आभार नागपूर शहर वराह पालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री विक्की प्रकाश बढेल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेंटर फॉर पीपल्स कलेक्टीव्हचे श्री सजल कुलकर्णी, अजिंक्य शहाणे, केव्हीकेचे विषय विशेषज्ञ श्री तुषार मेश्राम , श्री मोहन कापसे यानी अथक परिश्रम घेतले.