महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईदि.17 :-  शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र तांदूळ महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  करण्यात आले.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमुंबई येथे सुरु असलेल्या या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटीलखासदार सुप्रिया सुळेसहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले व मान्यवर उपस्थित होते.

            राज्यातील विविध भागात वेगवेगळ्या प्रकारचा तांदूळ, गहू, हळद आणि गावरान कडधान्य, डाळीअसे पीक शेतकरी  बांधव  घेत असतात.  या उत्पादनाला मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी  आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा तसेच ग्राहकांना योग्य दरात चांगल्या दर्जाचे धान्य उपलब्ध व्हावे यासाठी शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून  हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

            या महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व तांदूळ उत्पादकांशी उपमुख्यमंत्री श्री. पवार आणि सहकार मंत्री श्री. पाटील यांनी संवाद साधला. प्रत्येक स्टॉलवरील तांदळाची वैशिष्ट्ये जाणून घेतली. राज्याचे समृद्ध असे कृषी वैविध्य एकाच ठिकाणी पहायला मिळत असल्याबद्दलही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी समाधान व्यक्त केले.

            यशवंतराव चव्हाण सेंटर आणि श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड व ग्रोवर्स डायरेक्ट इंडिया लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला  महाराष्ट्र तांदूळ महोत्सव‘ गुरुवार दि. 17 ते 19 फेब्रुवारी 2022 असे तीन दिवस असणार आहे. यामध्ये सेंद्रिय निळाभातकाळाभातलाल तांदूळ (शुगर फ्री) इंद्रायणी, काळातांदूळ, कोलमवाडा कोलम, झिनी कोलम, ब्राउन राईसआंबेमोहोर, रायभोगकाळा गहूनाचणी ,सेंद्रिय काजूमहिला बचत गटांकडून तयार करण्यात येणारी उत्पादने यांचा समावेश आहे. नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन लाभ घ्यावाअसे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मिठी नदी प्रकल्पाबद्दल आयुक्तांचे राज्यपालांसमोर सादरीकरण

Thu Feb 17 , 2022
मुंबई, दि. 17 : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसमोर मिठी नदी विकास, प्रदूषण नियंत्रण व पुनरुज्जीवन या विषयावर सादरीकरण केले. राज्यपालांनी सदर कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी श्री. चहल यांनी राज्यपालांना सन 2005 मध्ये मिठी नदीला आलेल्या पुरानंतर पालिकेने मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेल्या कामाची विस्तृत माहिती दिली. नदीतील गाळ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com