नवी मुंबई :- राज्याच्या प्रशासकीय सेवेतील गट अ आणि गट ब संवर्गातील विविध रिक्त पदे भरती प्रक्रियेसाठी सन 2025 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबईचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी दिली आहे.
शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहे. हे वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिध्द करण्यात आले आहेत. प्रसिध्द करण्यात आलेले हे वेळापत्रक अंदाजित वेळापत्रक असून, जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संबंधीत परीक्षेचे परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे आणि तो वेळोवेळी अद्यावत करण्यात येईल. संबधित परिक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/अधिसुचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल. वेळापत्रकातील सन 2025मधील दिनांक निश्चित नसलेल्या परिक्षांचे दिनांक संबधित परिक्षेच्या जाहिरात/अधिसूचनेद्वारे स्वतंत्रपण जाहीर करण्यात येतील.आयोगाकडून आयोजित परिक्षेच्या दिनांकास अन्य संस्थेची परिक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यावयाची आहे.याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वत:घेणे आवश्यक आहे.असे ही प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.