रामटेक :- महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना यांच्या वतीने नुकताच दिनांक १७ ऑगस्ट ला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात जिल्हाध्यक्ष शेखर दुन्डे यांच्यावर विश्वास ठेवत रामटेक विधानसभा क्षेत्रातील अनेक तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्मान वाहतुक सेनेत प्रवेश केला. यावेळी प्रामुख्याने रामटेक व उमरेड विधानसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष शेखर दुन्डे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष खेमेंद्र (गुड्डू) पारधी व वरिष्ठ पदाधिकारी किरण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका संघटक मनोज पालीवार , मनसे रामटेक उपतालुका अध्यक्ष विनायक महाजन, मनसे रामटेक उपतालुका अध्यक्ष बजरंग काटोले,व सर्व पदाधिकारी मनसे सैनिक उपस्थित होते.
युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेत पक्षप्रवेश
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com