“महाराष्ट्र की मद्यराष्ट्र” भाजयुमोचा राज्यसरकारला सवाल..?

नागपुर – भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगरातर्फे आज वेरायटी चौक, नागपुर येथे काल कॅबिनेट मीटिंगमध्ये राज्य सरकारने किराणा दुकाने, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला त्या विरोधात आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीने किती ही प्रयत्न केले तरी महाराष्ट्राला आम्ही “मद्यराष्ट्र” होऊ देणार नाही.

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देणारा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने मद्यराष्ट्र करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल आहे. आधी पेट्रोल – डिझेल सारख्या अन्य दैनंदिन गरजेच्या गोष्टींचे दर कमी करण्याऐवजी राज्य सरकारने मद्याचे दर कमी करून आणि दारू विक्रीचे परवाने देण्यास सुरुवात करून यासाठीचे पहिले पाऊल टाकलेच आहे. यावरुन सरकारचे प्राधान्य दारूलाच असल्याचे दिसत आहे.

शेतकरी, गरीब, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी कोरोना काळात एक पैशाचीही मदत न देणारे हे बिघाडी सरकार मद्यविक्रीसाठी मात्र काटेकोर लक्ष देऊन निर्णय घेत आहे. नेमके कोणासाठी हे सरकार काम करत आहे, हे आता उघडच आहे.

आजचे आंदोलन हे भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके व भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्या मार्गदर्शनात आणि भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात झाले. यावेळी प्रामुख्याने भाजपा शहर महामंत्री व भाजयुमोचे पालक नरेंद्र (बाल्या) बोरकर, रामभाऊ आंबूलकर, भाजपा शहर संघटन महामंत्री सुनील मित्रा, भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, भाजयुमो प्रदेश सदस्य सारंग कदम, रितेश राहाटे प्रामुख्याने उपस्थित होते.

भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे व दिपांशु लिंगायत यांनी वृत्त माध्यमांशी बोलतांना सांगितले की आपला धत्रपती शिवरायांचा महाराष्ट्राला कदापी मद्यराष्ट्र होऊ देणार नाही. हा निर्णय जर सरकारने मागे घेतला नाही तर भविष्यात हे आंदोलन अधिक चिघळेल असे अव्हान राज्य सरकारला केले.

यावेळी मंडळ अध्यक्ष अमर धरमारे, शेखर कुर्यवंशी, बादल राऊत, यश सातपुते, सनी राऊत, पंकज सोनकर
संपर्कमंत्री सचिन सावरकर, वैभव चौधरी, ईशान जैन, शौनक जहांगीरदार, विद्यार्थी आघाडी संयोजक संकेत कुकडे, युवती आघाडी संयोजक डिंपी बजाज,प्रसिद्धी प्रमुख प्रसाद मुजुमदार,प्रसिद्धी सह- प्रमुख मनमित पिल्लारे, विद्यार्थी आघाडी सह-संयोजक गौरव हरडे, कमलेश पांडे, अर्पित मालघाटे, आशिष मोहिते, आशीष तिवारी, विक्की पांडे, देव यादव, उदय मिश्रा, चेतन धार्मिक, संदिप सुपटकर, राखी मानवटकर, अंजु उदासी, रिता गजभिये, कामाक्षा रेनके, खुशी जैसवाल, पल्लवी गिरोले, अमित बाराई, नितीन सिमले, आकाश भेदे, सागर बनोदे, प्रणय फुलझेले, अर्पित मालघाटे, कौस्तुभ मुरमुरे, प्रशांत इंगळे, स्वरूप कोडमलवर, साम मते, चिंटू डोंगरे, राजेश नेरकर, हिमांशू पारधी, मोहित भिवंणकर,, मोहित घायवट, गौरव काटकर, तेजस भागवाटकर, धीरज कोठे, गोविंदा काटेकर, प्रशांत बघेल, निलेश रारोकर, हर्षल वाडेकर, भूषण सिलोटिया, शुभम पाशीने, हरिश निमजे, रितेश पांडे, शुभम मौंदेकर, पवन महाकाळकर, समीर मांडले, अनिकेश लोखंडे, अभिजीत गायधने, गोलु निपाने, सागर घाटोले, अक्षय शर्मा, वरुण गजभिए, प्रीतिश पाटिल, गौरव पाठक, सौरभ साहू, कमलेश बोमिलवार, आकाश बनिया, प्रथम शिवहरे, ईशान चौरसिया, दीपांशु सेन, आशीष मिश्रा, विक्की बगले, रितेश पांडे, शिवंश प्रजापति, शम्मी समूँदरे, विक्की किरपाने, अजिंक्य सहारे, पिंकेश पट्ले, पंकज यादव, राकेश भोयर,आशुतोष भगत उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

युवा समाजसेवी अरविंदकुमार रतूड़ी समाज रत्न भूषण सम्मान से सम्मानित

Fri Jan 28 , 2022
नागपुर – नागपुर सक्करदारा चौक युवा समाजसेवी और सामाजिक संगठन किंग कोबरा आर्गेनाइजेशन यूथ फोर्स राष्ट्र निर्माण की और दो कदम नारी शक्ति एक सम्मान पशु क्रूरता के ख़िलाफ़ जंग के संस्थापक अध्यक्ष और राष्ट्रीय अंतर्राष्ट्रीय मानवअधिकार कार्यकर्ता श्री अरविंदकुमार रतूड़ी को उनके विभिन्न जन हितार्थ देश हितार्थ प्राणी हितार्थ निःशुल्क निस्वार्थ लगभग तीस सालों से निरंतर चले आ रहे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!