नागपूर :- महाराष्ट्राच्या कल्याणाचे मार्ग प्रशस्त करण्यासाठी आणि शरद पवारांच्या घाणेरड्या राजकारणाचे मिथक तोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र सरकारला गरज आहे, अशी प्रतिक्रीया भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रपरिषदेतील भूमिकेवर त्यांनी पत्रकाद्वारे आपली प्रतिक्रीया मांडली.
ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे समर्पीत भावनेचं नेतृत्व महाराष्ट्राला लाभले आहे, हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. एखाद्या सार्वत्रिक निवडणुकीत अपयश आले म्हणून असा टोकाचा निर्णय घेण्याची आवश्यकता वाटत नाही. या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांसारखे नेतृत्व, ओघवतं वकृत्व आणि महाराष्ट्राच्या कल्याणाचे निर्णय घेणा-या नेतृत्वाची महाराष्ट्राला ख-या अर्थाने गरज आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांसारख्या व्यक्तिमत्वाने जी घाण करून ठेवली, जे धार्मीक ध्रुवीकरणाचे वारे वहावले, अल्पसंख्यकांच्या तुष्टीकरणाचा विषय डोळ्यापुढे मतांवर डल्ला मारला, संविधानाच्या बाता करून संविधानाच्या संरक्षणाच्या माध्यमातून दलितांच्या मतांचे ध्रुवीकरण केलं, अशा मिथकांना तोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्च सरकारमध्ये असण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
फडणवीस यांना विनंती करताना ते म्हणाले, ‘देवेंद्र फडणविस महाराष्ट्राला तुमची गरज आहे आणि येत्या काळामध्ये संघटीतपणे भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणूनआम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्याच नेतृत्वात सर्व लोकांना दाखवून देउ की, कोणत्याही पद्धतीने आम्ही बॅकफुटवर आलेलो नाही. पुढची युती निवडणूकच नव्हे तर संपूर्ण राजकारण तुमच्या नेतृत्वातच लढले जाईल आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्र देखील देशाच्या विकासात आपले योगदान देईल. त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा निर्णय घेण्याची घाई करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही.