महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची आज होणार घोषणा, थोड्याच वेळात आयोगाची पत्रकार परिषद

मुंबई :- लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनतेचे लक्ष महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. अखेर आज (15 ऑक्टोबर) दुपारी 3.30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात येणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे. दुपारी 3.30 मिनिटांनी ही पत्रकार परिषद सुरू होईल. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रसह झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद पार पडत असल्याने सर्वांचेच लक्ष त्याकडे लागले आहे. महाराष्ट्रातील निवडणूक यंत्रणेची तयारीही अंतिम टप्प्यात सुरु आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष दिल्लीकडे लागले आहे.

कोणत्या राज्यात किती जागा?

महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य आहेत. महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे. झारखंड विधानसभेत 81 सदस्य आहेत. या राज्यात 2019 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. हरियाणामध्ये 90 जागा आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे राज्य विभागले गेले आहे. याआधी 2014 मध्ये येथे शेवटची निवडणूक झाली होती.

Source by tv9 marthi

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

7 आमदारांच्या शपथविधीविरोधात ठाकरे गट हायकोर्टात; निर्णय राखीव असताना नियुक्त्या घटनाबाह्य, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा

Tue Oct 15 , 2024
मुंबई :- केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं आज दुपारी पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. आज महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे त्यापूर्वी राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावर हायकोर्टात तातडीच्या सुनावणीची शक्यता आहे. 7 विधानपरिषद आमदारांच्या शपथविधीविरोधात शिवसेना ठाकरे गट पुन्हा हायकोर्टात गेला असून याविरोधात याचिका दाखल करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com