अरोली :- गट ग्रामपंचायत रेवराल अंतर्गत येत असलेल्या रेवराल(टोली )येथे परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्या फेब्रुवारी महिन्याच्या 18 तारीख मंगळवारला दुपारी दोन वाजता दरम्यान सार्वजनिक हनुमान मंदिर येथे महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी वीरसी, राजोली, नांदगाव, खरडा, रेवराल, रेवराल (टोली) या गावांमधील भजन मंडळांचे भजन संमेलन होणार आहे.
कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान सार्वजनिक हनुमान मंदिर पंच कमिटी सह समस्त ग्रामवासी रेवराल ( टोली) यांनी केले आहे.