नागपूर :- नागपुरात पन्नास वर्षांपूर्वी पासून महात्मा फुले मार्केट व तिथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे भव्य पुतळे देखील आहेत. परंतु येथे बनलेल्या महामेट्रो स्टेशनचे नाव महात्मा फुले स्टेशन ठेवण्याऐवजी त्या महापुरुषाला अपमानित करण्यासाठी जातीयवादी भावनेतून कॉटन मार्केट असे नाव ठेवून त्याचे आज उद्घाटन केले या कृतीचा बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी निषेध करून महात्मा फुले यांच्या नावाने त्यात त्वरित दुरुस्ती करावी अशी सूचना केली.
मागील आठवड्यात 13 सप्टेंबर रोजी बसपाच्या शिष्टमंडळाने महा मेट्रोचे नवनियुक्त व्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन शहरातील अनेक स्टेशन बाबत सूचना व आक्षेप नोंदवले होते त्यावेळी या स्टेशनला महात्मा फुले यांचे नाव देण्याची सूचना सुद्धा केली होती व ते निवेदन 14 सप्टेंबरला सर्व वृत्तपत्रांकडे पाठवले देखील होते हे विशेष