महा बास्केटबॉल असोसिएशन तर्फे महाराष्ट्र राज्यात “महाबास्केट 3 ऑन 3” या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

नागपूर :- बास्केटबॉल 3 ऑन 3 हा बास्केटबॉल मधील नवीन प्रकार ज्यामधे प्रत्येक संघात 4 खेळाडू असतात व त्यातील 3 खेळाडू खेळतात व उर्वरित 1 खेळाडू राखीव असतो. बास्केटबॉल 3 ऑन 3 हा क्रीडा प्रकार ऑलिंपिक मध्ये सुद्धा खेळण्यात येतो. येणार्‍या ऑलिंपिक मध्ये बास्केटबॉल 3 ऑन 3 ह्या क्रीडा प्रकारला समाविष्ट करण्यात आलेले आहे.

महाबास्केट 3 ऑन 3 चे आयोजन हे जिल्हास्तरीय, विभाग स्तरीय तसेच राज्य स्तरीय अश्या पद्धतीने करण्यात येणार आहे. 18 वर्षे खालील मुले मुली तसेच 18 वर्षे वरील मुले मुली अश्या 4 गटामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा घेऊन प्रत्येक जिल्हया मधून 2-2 संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र होतील. या साठी विदर्भ (11 जिल्हे), मराठवाडा (8 जिल्हे), पश्चिम महाराष्ट्र – कोकण (9 जिल्हे) तसेच मुंबई – खांदेश (8 जिल्हे) अशी विभागणी केलेली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रत्येक विभागातून 4-4 संघ पात्र ठरतील.

संबंधित जिल्ह्यांमधून संघ पात्र न ठरल्यास ज्या जिल्ह्यात जास्त संघांचा सहभाग आहे अश्या जिल्ह्यातून अतिरिक्त संघांना वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्यात येईल.

नागपूर जिल्ह्यात स्पर्धेचे आयोजन नागपुर जिल्हा बास्केटबॉल संघटनेतर्फे दिनांक 31 मार्च ते 2 एप्रिल या मध्ये शिवाजी नगर जिमखाना येथील मैदानावर करण्यात येईल. विदर्भ विभाग स्तरीय स्पर्धा दिनांक 8 व 9 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात येतील. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडूंना फीबा या आंतराष्ट्रीय बास्केटबॉल संघटनेच्या वेब साइटवर स्वतःचे प्रोफाइल बनवावे लागेल. त्या नंतर प्रोफाइल बनवलेले कोणतेही 4 खेळाडू आपला एक संघ बनवून त्याची ऑनलाइन नोंदणी करतील. या 4 खेळाडूंपैकी 1 संघाचा कर्णधार राहील. बास्केटबॉल 3 ऑन 3 च्या नियमा प्रमाणे संघाला कोणताही प्रशिक्षक राहणार नाही. प्रवेश शुल्क प्रती संघ रु. 400/- असून हे शुल्क अंतिम तारखेचे आत अमित संपत, राकेश माहेश्वरी किंवा आयुष अग्रवाल यांचेकडे शिवाजी नगर जिमखाना येथे सायंकाळी 6 वाजेनंतर जमा करावे. नोंदणी ची अंतिम तारीख 23 मार्च असून दिनांक 25 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता शिवाजी नगर जिमखाना येथे सर्व पंच व खेळाडू यांचेसाठी “बास्केटबॉल 3 ऑन 3 खेळाची नियमावली” व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. महाबास्केट 3 ऑन 3 या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना अंतरराष्ट्रीय फीबा 3 ऑन 3 चे नामांकन प्राप्त होईल.

स्पर्धेत सहभागी इच्छुक खेळाडूंनी अधिक माहिती साठी जिल्हा / विभागीय समन्वयक अमित संपत व राकेश माहेश्वरी यांचेशी संपर्क साधावा.

पत्र परिषदेला उपस्थित: धनंजय वेळूकर, शत्रुघ्न गोखले, भावेश कुचनवार, अमित संपत, राकेश माहेश्वर

@फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

टाकळघाट येथे विद्युत कर्मचाऱ्यांचा सत्कार

Sat Mar 18 , 2023
संदीप बलविर, प्रतिनिधी – ग्रामपंचायत टाकळघाट चा उपक्रम टाकळघाट :- टाकळघाट व परिसरातील विद्युत पुरवठा अखंडपणे कार्यरत ठेवण्यासाठी सतत प्रयत्नरत राहणाऱ्या विद्युत कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायत टाकळघाट कडून आज दि १८ मार्च ला सत्कार करण्यात आला. दिवस रात्र विद्युत पुरवठा सुरळीत रहावा व टाकळघाट येथील जनतेला कुठलाही त्रास सहन करावा लागू नये म्हणून सतत प्रयत्नरत राहणारे लाईन मेन हे खरोखरच सरकारचे मानकरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com