नागपुर – महा बास्केटबॉल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. धनंजय वेळूकर तसेच सचिव शिव छत्रपती पुरस्कार विजेते शत्रुघ्न गोखले यांचा भव्य नागरी सत्कार नागपुर नगरीचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांचे हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन दोघांचाही सत्कार करण्यात आला. या समारंभाचे आयोजन शिवाजीनगर नागरिक मंडळ तसेच शिवाजी नगर जिमखाना यांचेतर्फे करण्यात आले होते.
समारंभाला मंचावर मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जाधव, माजी नगरसेवक संजय बंगाले, नागपुर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक शरद सूर्यवंशी, शिवाजी नगर जिमखान्याचे अध्यक्ष अविनाश बेंद्रे तसेच शिवाजी नगर नागरिक मंडळाचे अध्यक्ष निखिल मुंडले उपस्थित होते.
या कार्यक्रमाला वरिष्ठ बास्केटबॉल संघटक सुरेश घुगरे, अरविंद गरुड, महेश उपदेव, अरविंद जोशी, उमेश भदाडे, सुबोध दिक्षित, श्री वाल्मिकी फाऊंडेशन चे सतीश डगोर, संजीवनी फाऊंडेशन चे नीलेश नगरकर, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष समीर श्रीवास्तव, नूतन भारत युवक संघाचे सचिव संदीप दुरुगकर, प्रशांत सोनोणे, मंगेश सांभे, जीकेम चे सचिव जगदीश पंचबुद्धे, यूबीए चे सचिव सचिन ढगे, पुष्पक तांबेकर, अनुप मस्के, परीक्षित पांडे यांचेसह विविध क्लब चे पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू व त्यांचे पालक मोठ्या संखेने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे संचालन उत्तरा पटवर्धन यांनी केले.