मधुकरराव तामगाडगे प्रेरणा प्रबोधिनी वाचनालयात ; महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध जयंती उत्साहात

नागपुर – समता, शांती, बंधुभाव, प्रज्ञा, शील, करुणा नि विवेकबुद्धीचा शाश्वत मार्ग मानवजातीला दाखविणाऱ्या महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांची 2566 वी जयंती मधुकरराव तामगाडगे प्रेरणा प्रबोधिनी वाचनालयात उत्साहात साजरी करण्यात आली. ओमकार नगर येथील इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटीमधील स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट मुख्यालयातील दुसऱ्या माळयावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला प्रा. प्रिती गजभिये व ट्रस्टचे व्यवस्थापक अमोल कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अपर्ण करून पूजन करण्यात आले. यानंतर सामुदायिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. याप्रसंगी वाचनालायात अभ्यासरत प्राची भगत, स्लेशा शंभरकर सागर सरकटे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत सहारे यांनी तर आभार राजन शामकुळे यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

समाजाला पोलिसांचा अभिमान वाटेल असे कार्य करा - अमितेश कुमार

Tue May 17 , 2022
पोलीस प्रशिक्षणार्थींच्या 110 व्या सत्राचा दीक्षांत संचलन         नागपूर : प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर समाजात शांतता, सौहार्द वाढविण्याचे काम करा. तसेच समाजाला पोलिसांचा अभिमान वाटेल, असे कार्य करण्याचा सल्ला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रशिक्षणार्थी पोलिसांना दिला. शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडणा-या प्रशिक्षणार्थींच्या ११० व्या सत्राचा दीक्षांत समारंभ आज पार पडला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.             या प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींची कार्यक्षमता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!