संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- तेलंगणामध्ये कांग्रेस सरकारने शेतकरी हिताचा विचार करीत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे.यामुळे 15 ऑगस्ट पूर्वी तेलंगणामध्ये 40 लाख शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफ होणार आहे.त्याच धर्तीवर महाराष्ट्रासह कामठी मौदा विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देऊन दिलासा द्यावा अशी मागणी कांग्रेसचे कामठी मौदा विधानसभा चे नेते माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केली आहे.
राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने 2021 साली राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपया पर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता.तसेच पीक कर्जासाठी नियमित कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतोराव फुले कर्जमुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिल्या जात होते.याचा राज्यातील अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला.सध्या राज्यातील शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शेतकरी हिताचा विचार करत तेलंगणा सरकार प्रमाणे राज्यासह कामठी मौदा विधांनसभेतील शेतकऱ्यांसाठी तातडीने कर्जमाफीची घोषणा करावी तसेच कर्जमाफीच्या वेळी शेतकऱ्यांसाठी ज्या जाचक अटी व नियम लावण्यात आले होते ते सर्व नियम रद्द करावे अशी मागणी सुरेश भोयर यांनी केले आहे.