लिहीगाव ग्रामपंचायत वतीने ज्येष्ठ नागरिकांचा गौरव

– संदीप कांबळे, कामठी

कामठी ता प्र 10:- ,तालुक्यातील लीहीगाव ग्रामपंचायत च्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला ज्येष्ठ नागरिक गौरव कार्यक्रमाची सुरुवात नागपुर जिल्हा परिषदेच्या गटनेत्या प्राचार्य अवंतिका लेकुरवाळे यांचे याचे दिपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी सरपंच गणेश झोड,उपसरपंच सुनिता ठाकरे ,ग्रामपंचायत सदस्य रवींद्र निकाळजे, सुषमा ठाकरे ,विषाखा बोरकर ,हरीश निकाळजे, सुनिता सोनटक्के ,माजी सरपंच जामवंत ठाकरे , कृष्णराव ढेगरे उपस्थित होते पाहुण्यांच्या हस्ते गावातील 21 महिला व पुरुष जेष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ ,स्मृतिचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सरपंच गणेश झोड म्हणाले गावातील जेष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शन व आशीर्वादामुळेच आपण गावातील सर्व समाजातील नागरिकांना घेऊन विकास कामे करीत असल्याचे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी श्याम उचेकर यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राज्याच्या अर्थव्यवस्थेत 12.1 टक्क्यांची वाढ अपेक्षित

Fri Mar 11 , 2022
वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी 2021-22 चा अहवाल  मुंबई  :- राज्याच्या अर्थव्यवस्थेत २०२१-२२ च्या पूर्व अनुमानानुसार १२.१ टक्के वाढ, देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्के वाढ तसेच दरडोई राज्य उत्पन्न 2,25,073 अपेक्षित असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2021-22 मांडला. सेवा आणि उद्योग क्षेत्रात भरीव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com