कामठी ता प्र 13:-सध्या सर्वत्र सुरू असलेल्या सततधार पावसाने जिकडे तिकडे जनजीवन विस्कळित झाले आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कामठी तालुक्यातील ग्रामीण भागातील नदी नाले अक्षरशः भरून वाहत असतांनाच गतमध्यरात्री कामठी तालुक्यातील आजनी गावातील ओंकार चमेले यांच्या अंगणात असलेल्या नारळाच्या झाडावर वीज कोसळली. यामुळे संपूर्ण गावात जोराचा एकच आवाज झाल्याने नागरिक भयभीत झाले होते. आजनी गावातील लेंडी नाला कन्हान नदीला जुडला असल्याने मागच्या वर्षी आलेल्या महापुरात गावातील अनेकांचे नुकसान झाले होते.
वीज कोसळताच ओंकार चमेले यांच्या घरची इलेक्ट्रिक वायरिंग जळून पूर्णतः निकामी झाली आहे. तसेच छताला सुध्दा तडे गेले आहेत.सुदैवाने जीवितहानी टळली .
आजनीत कोसळली अंगणातील झाडावर वीज
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com