नागपूर :- कमला नेहरू महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती राष्ट्रीय ग्रंथालय दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी बंजारी, संस्थेचे सचिव तथा नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार ऍड. अभिजित बजारी तसेच संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. स्मिता वंजारी यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे तसेच ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमला नेहरू महाविद्यालयाच्या ग्रंथपाल सुवर्णा इनामदार होत्या. तर प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक, ग्रंथालय शिक्षण विभागाच्या सहायक प्राध्यापिका मुग्धा राजणकर, सहायक ग्रंथपाल हेमलता डूके उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी माता सरस्वती व डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रंथपाल सुवर्णा इनामदार यांनी एस.आर. रंगनाथन यांच्या अॅकेडमिक लायब्ररीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर ग्रंथालय व्यवस्थापनात एकसूत्रपणा आणण्यासाठी डॉ. एस.आर. रंगनाथन यांनी सांगितलेल्या पाच सिध्दांतावर सहायक प्राध्यापिका मुग्धा राजणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्नेहल किटूकले या विद्यार्थीनीने डॉ. एस.आर. रंगनाथन यांचा परिचय करून दिला. लोकेश झोडे याने ग्रंथालयातील योगदानावर प्रकाश टाकला, तर पिंटू नखाते यांनी ग्रंथालय माहितीशास्त्र आणि शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. आभार शास्त्रकार हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय आदमने रोहित खंडाते, संजना उमरे, राखी वाघमारे, छाया घरड यांच्यासह ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.