विद्येच्या देवतेला विद्यालंकारांनी करूया नमन; हार, फुले,मोदकांसह शैक्षणिक साहित्य करू या अर्पण एक वही, एक पेन अभियानचे आवाहन 

मुंबई :- समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून येत्या गणेशोत्सवात विद्येची देवता असलेल्या गणरायचरणी हार, फुले, मोदकांसह वह्या पेन, पेन्सिल व शैक्षणिक साहित्य अर्पण करून नमन करावे असे आवाहन एक वही एक पेन अभियानच्या वतीने राज्यातील गणेशभक्त व गणेश मंडळांना करण्यात आले आहे .

येत्या १९ सप्टेंबर रोजी श्रीगणेशाचे आगमन होत आहे महाराष्ट्रात १० दिवस गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो आकर्षक रोषणाई, देखावे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते .राज्यातील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व व पक्ष संघटनांकडून स्तुत्य असे उपक्रमदेखील राबविले जातात याचाच एक भाग म्हणून गणेशभक्तांनी दर्शनाला येताना हार फुले, मोदक, नारळ या पूजेच्या व प्रसादाच्या वस्तुसह आपापल्या परीने वह्या, पेन पेन्सिल स्कूल बॅग ,वापरात नसलेले जुने मोबाईल, टॅब पुस्तके, आदी शैक्षणिक साहित्य गणरायाचरणी अर्पण करावे .

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील आपल्या मंडळाच्या वतीने गणेशभक्तांना तसे आवाहन करावे असे आवाहन एक वही एक पेन अभियानाच्या वतीने करण्यात आले आहे.

जमा झालेले शैक्षणिक साहित्य समाजातील गरजू होतकरू तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना वितरीत करून या विदयार्थ्याना मदतीचा हात देण्यात यावा अधिक माहितीसाठी तसेच सहकार्यासाठी मदतीसाठी ९३७२३४३१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मागील आठ वर्षांपासून समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या एक वही एक पेन अभियानच्या वतीने करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनोहरभाई पटेल अकादमी तर्फे एक्युप्रशर, वाईब्रेशन सुजोक चिकित्सा शिबीर

Sat Sep 9 , 2023
गोंदिया :- मनोहरभाई पटेल अकादमीच्या वतीने एक्युप्रशर, वाईब्रेशन सुजोक ६ दिवसीय शिबीर नुकतेच पार पडले. नमाद महाविद्यालयात पार पडलेल्या या शिबिराचा लाभ दोन हजार पेक्षा अधिक विध्यार्थी आणि शिक्षकांनी घेतला. मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली नमाद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वात हे शिबीर घेण्यात आले. या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!