मुंबई :- विधान भवन, मुंबई येथे आज देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विधानसभेचे अध्यक्ष, ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे माजी सदस्य ॲड. जयप्रकाश बाविस्कर, विधानसभेचे माजी सदस्य राम संभाजी गुंडीले, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे आणि डॉ.विलास आठवले, सहसचिव शिवदर्शन साठये, उप सचिव सुभाष नलावडे, उमेश शिंदे, अवर सचिव विजय कोमटवार यांच्यासह, सुनिल वाणी, रविंद्र खेबुडकर, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. विधानमंडळाचे उप मुख्य सुरक्षा अधिकारी श्रीराम कोरेगांवकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.