कायदेविषयक शिक्षण शिबीर संपन्न

गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे समान किमान कार्यक्रमानुसार माहे जुलै – २०२४ मध्ये ” बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २०१५” या विषयावर कार्यक्रम घेणेबाबत निर्देश दिलेले होते. त्या अनुषंगाने विकास एस. कुलकर्णी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांचे आदेशानूसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली तर्फे दिनांक ०६ जुलै २०२4 रोजी दुपारी ०२.०० वाजता ‘विधी सेवा सदन’, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली येथे कायदेविषयक शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कायदेविषयक शिक्षण शिबिरास अध्यक्ष म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, आर. आर. पाटील हे उपस्थित होते. तसेच ॲड. अरूण महादेवराव अंजनकर, रिटेनर अधिवक्ता, ॲड. दिपक उंदिरवाडे, रिटेनर अधिवक्ता हे सुध्दा उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.अरुण महादेवराव अंजनकर यांनी केले. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. दिपक उंदिरवाडे, रिटेनर अधिवक्ता यांनी उपस्थितांना बालकांचे अधिकार व काळजी आणि त्यांचे संरक्षण या बाबत संपुर्ण माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर.पाटील यांनी उपस्थितांना बालकांची काळजी व संरक्षण कायदा, २०१५ या बाबत सखोल माहिती दिली.

कायदे विषयक शिक्षण शिबिराचे संचालन जे.एम.भोयर, कनिष्ठ लिपीक यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी एन. आर. भलमे, वरिष्ठ लिपीक, जे. एम. भोयर, कनिष्ठ लिपीक, एन. यु.बुरांडे, लेखापाल, आणि एस. डब्ल्यू. वासेकर, व शिल्पा धोंगडे, शिपाई यांनी अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

BLOOD DONATION CAMP AT VAYUSENA NAGAR

Wed Jul 10 , 2024
Nagpur :- On the occasion of World Blood Donor Day, a Voluntary Blood Donation Camp was organised at Head Quarters Maintenance Command Vayusena Nagar, Nagpur on 09 Jul 24. A large number of air warriors, Non- combatants, civilians, and their families voluntarily donated blood for the noble cause.  Air Marshal Vijay Kumar Garg AVSM, VSM, Air Officer Commanding-in-Chief Maintenance Command […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com