यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वाहतुक व जाजू इंग्लिश मिडीयम स्कुलच्या संयुक्त विद्यमाने वाहतुकीचे नियम व अंमली पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्परिणाम या विषयावर कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार होते. प्रमुख वक्ते म्हणुन पोलिस निरीक्षक अजित राठोड प्रमुख पाहुणे म्हणून जाजू महाविद्यालयाचे प्राचार्य रितेश चांडक, जाजू इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्राचार्य सतिष उपरे उपस्थित होते. सदर शिबिर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
कार्यकमाचे अध्यक्ष सचिव यांनी कोणतीही गाडी चालवित असतांना वाहतूकीच्या नियमांचे काटेकारेपणे पालन केल्यास अपघात टळतो. अपघात हा एकाचा नसून संपुर्ण घरावर याचा आघात होतो याबाबत माहिती दिली. उपस्थित मुलींना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श काय असतो याबाबत सुध्दा कुणाल नहार यांनी माहिती दिली.
यावेळी पोलिस निरीक्षक अजीत राठोड यांनी वाहतुकीचे नियमांबात माहिती दिली. वाहन चालवितांना रस्त्यांवर चे चिन्ह दाखविले जातात त्याचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असते. अपघात हा जाणूनबुजुन होत नाही तर आपल्या चुकीमुळे होतात. हेल्मेट वापरणे सुध्दा आज काळाची गरज आहे. हेल्मेट घातल्याने अपघात झाल्यास डोक्याला मार लागणार नाही, असे सांगितले. वयवर्ष १८ वर्षापेक्षा कमीच्या मुलांनी गाडी चालविणे गुन्हा आहे. तसेच अमंलीपदार्थ सेवनामुळे विद्यार्थ्यांचे कसे हाल होतात आणि घरातील आई वडीलांचे सुध्दा अतोनात नुकसान कसे होते अजीत राठोड यांनी उदाहरणासह माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रिया कंडुरवार यांनी केले. कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्येने विद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होते.