कळमेश्वर :- कळमेश्वर येथील स्टाफ पोस्टे परिसरात प्रोव्हिशन रेडकामी फिरत असताना मुखबिर कडून विश्वसनिय खबर मिळाली कि, कळमेश्वर हद्दीतील पारधी बेडा गोडखैरी ता. कळमेश्वर येथे एक इसम मोहाफुल हातभट्टीची दारु गाळत आहे. अशा खबरे वरुन पारधी बेडा गोडखैरी येथे मोहाफुल गावठी दारू गाळणाऱ्या इसमावर कार्यवाही करण्यात आली. अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु काढणारी महिला आरोपी ही हातभट्टी लावुन मोहाफुल गावठी दारू गाळतांना दिसुन आली. महिला आरोपीचे ताब्यातून १) १८०० लिटर मोहाफुल रसायन सडवा कि ३५ रू लिटर प्रमाणे एकुण कि ६३,०००/- रू २०५० लिटर च्या ५ डबक्या मध्ये २५० लिटर मोहाफुल दारू प्रत्येकी लिटर १०० रू प्रमाणे एकुण २५०००/- रु ३) ८ एलास्टीक डम प्रती ड्रम ४०००/- रु तसेच ५ प्लास्टीक डबक्या प्रत्येकी कि १०० रू असा एकुण ५०० रू असा एकुण ९२,५००/-रू था मुद्देमाल मिळून आल्याने मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला. महिला आरोपी विरुद्ध पो. स्टे कळमेश्वर येथे कलम ६५ (फ), (व), (ई) महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोस्टे कळमेश्वर हद्दीतील पारधी बेडा गोंडखैरी येथे अवैधरित्या मोहाफुल गावठी दारू काढणाऱ्या इसमावर कायदेशिर कार्यवाही
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com