संसदीय अभ्यासवर्गात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार,दै.सकाळ, नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे यांचे सोमवारी मार्गदर्शन

नागपूर, दि. 23 : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘विधिमंडळाचे कामकाज आणि प्रसारमाध्यमांची भूमिका व जबाबदारी’ या विषयावर दै.सकाळ, नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे मार्गदर्शन करणार आहेत तर सकाळी 9.30 वा. ‘संसदीय लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधी पक्षांचे स्थान, कर्तव्ये आणि विधिमंडळातील भूमिका’ या विषयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत.

भारतातील संसदीय लोकशाही कशा पद्धतीने कार्यरत आहे, कार्यकारी मंडळावर विधानमंडळामार्फत कशाप्रकारे नियंत्रण ठेवले जाते, त्यासाठी कोणकोणत्या संसदीय आयुधांचा वापर केला जातो, अर्थसंकल्पीय प्रक्रिया, विधिमंडळाची समिती पद्धती, कायदा तयार करण्याची प्रक्रिया इत्यादी बाबतची प्रत्यक्ष माहिती नामांकित संसदपटू व तज्ज्ञांच्या व्याख्यानांमधून तसेच सभागृहाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या अवलोकनद्वारे विद्यार्थ्यांना या व्याख्यानांतून मिळत असते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रेडक्रॉस सोसायटीमध्ये लोकांचा सहभाग वाढवा - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Fri Dec 23 , 2022
रेडक्रॉस सोसायटी भंडारा शाखा सन्मानित नागपूर, दि. 23 : देशात परोपकाराची भावना आजही कायम आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना मदत करण्यात येते. इंडियन रेडक्रॉस सोसायटी ही जुनी आणि महत्त्वाची संस्था आहे. रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाजपयोगी कामे करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना सहभागी करुन घ्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. आज 23 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com