प्लास्टिक पाईप ३ बंडल किंमत ३६०० रू. चा पकडुन आरोपीवर गुन्हा दाखल.
कन्हान : – मा. पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण यांचे आदेशाने पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत स्थागुअशा नागपुर (ग्रा) पथकाने वेकोलि खदान परिसातील गस्त करित असताना वेकोलि खुली खदान येथुन चोरी केलेले ३ बंडल प्लास्टिक पाईप किंमत ३६०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीवर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीस स्टेशन च्या स्वाधिन करण्यात आले.
प्राप्त माहीती नुसार कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि उपक्षेत्र कामठी व उपक्षेत्र गोंडेगाव च्या तीन खुली कोळसा खदान परिसरात स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाने पेट्रोलिंग करित असताना मिळालेल्या गुप्त माहीती वरून सोमवार (दि.२१) मार्च ला आरोपी जुनिदे इकबाल अन्सारी वय २४ राह. खदान नं.३ यास पकडुन त्याच्या ताब्यातुन वेकोली खदान परिसरातुन ३ बंडल प्लास्टीक पाईप किंमत ३६०० रूपयाचा चोरी केलेला मुद्देमाल जप्त करून आरोपी जुनिदे इकबाल अन्सारी विरुद्ध अप क्र १३५/२०२२ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हे नोंद करून पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन कन्हानचे ताब्यात देण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथकाचे सपोनि अनिल राऊत, पोहवा विनोद काळे, नाना राऊत, अरविंद भगत, शैलेश यादव, विरेंद्र नरड, प्रणय बनाफर, चालक साहेबराव बहाळे यांनी यशस्विरित्या पार पाडली.