क्रीडा भूषण पुरस्कार नोंदणीसाठी १९ जानेवारी शेवटची तारीख , ग्लोकल मॉल सीताबर्डी येथे करा नोंदणी

खासदार क्रीडा महोत्सव २०२३

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचे पाचवे पर्व उत्स्फूर्त प्रतिसादासह नागपूर शहरात सुरू आहे. खासदार क्रीडा महोत्सवामध्ये क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी खेळाडूंना क्रीडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १९ जानेवारी २०२३ असून क्रीडा संघटनांनी संबंधित खेळाडूंचे अर्ज लवकरात लवकर सादर करावे, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

क्रीडा भूषण पुरस्कारासाठी खासदार क्रीडा महोत्सवात सहभागी क्रीडा संघटनांनी आपापल्या क्रीडा प्रकारातील खेळाडूंचे अर्ज सादर करणे आवश्यक असून ज्या संघटनांकडून अर्ज प्राप्त होणार नाही, त्या संघटनांना क्रीडा भूषण पुरस्कार देण्यात येणार नसल्याचे खासदार क्रीडा महोत्सव समितीद्वारे जाहिर करण्यात येत आहे.

खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात रविवारी २२ जानेवारी २०२३ रोजी क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी अर्ज सादर करणे अनिवार्य असून उद्या गुरूवार १९ जानेवारी २०२३ पर्यंत सीताबर्डी येथील खासदार क्रीडा महोत्सवाच्या ग्लोकल मॉल येथील कार्यालयात अर्ज सादर करावे, असेही आवाहन महोत्सव समितीद्वारे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यात डिसेंबरमध्ये ४६ हजार उमेदवारांना रोजगार - कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

Wed Jan 18 , 2023
मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये डिसेंबर २०२२ मध्ये ४६ हजार १५४ नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महारोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com