भूमी अभिलेख विभाग सरळसेवा भरती 2021, भूकरमापक तथा लिपीक पदाची परीक्षा 28 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत होणार

मुंबई :- भूमी अभिलेख विभागातील गट ‘क’ पदसमूह (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. या पदाची परीक्षा 28,29 आणि 30 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. 28 नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये पुणे विभागाची तर सत्र 2 मध्ये कोकण विभागाची परीक्षा होईल. 29 नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये औरंगाबाद विभागाची तर सत्र 2 मध्ये नाशिक आणि अमरावती विभागाची परीक्षा होणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये नागपूर विभागाची परीक्षा होईल, अशी माहिती जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक एन.के. सुधांशू यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत माहिती विभागाचे अधिकृत संकेतस्थळ http://mahabhumi.gov.in यावर उपलब्ध होणार आहे. संबंधित उमेदवारांने संकेतस्थळावरील सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेवून परीक्षा द्यावयाची आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 च्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्यामुळे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असू शकते.

सेवाप्रवेश नियमांनुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हते ऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्रे अपलोड केलेली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपूर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) २८ ते ३०/११/२०२२ या कालावधीत IBPS कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर होईल. परीक्षेबाबत संभाव्य वेळापत्रक खालील प्रमाणे असेल.

भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता ०९/१२/२०२१ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्याकामी दिनांक ०९/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ या कालावधीत उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी व अर्ज स्विकृतीचे काम करण्यात आलेले होते.

०९/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची माहिती (DATA) प्राप्त झालेनंतर सदर DATA ची प्राथमिक तपासणी केली असता भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक तथा लिपिक पदाकरीता जाहिरातीत नमूद अर्हता धारण न करणाऱ्या उमेदवारांनी देखील अर्ज सादर केल्याचे दिसून आले. तसेच उमेदवारास कोणत्याही एकाच विभागाकरीता अर्ज सादर करण्याबाबत सूचना असून देखील काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक विभागाकरीता अर्ज सादर केलेले दिसून आले. या कारणास्तव विभागाकडून २८/०२/२०२२ ते १३/०३/२०२२ या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवित दुबार अर्ज भरलेल्या उमेदवारांना कोणत्याही एकाच विभागातील अर्ज कायम करण्याची तसेच अर्हता धारण करत असल्याबाबत प्रमाणपत्रे अपलोड करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.

छाननी अर्ज प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या सूचनांनुसार ज्या उमेदवारांनी दिनांक ९ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत त्यांनी छाननी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे तसेच छाननी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या उमेदवारांच पदभरती प्रक्रियेतील परीक्षेस बसण्याकरीता पात्र करण्यात येईल. जे उमेदवार अर्हतेबाबत प्रमाणपत्रे अपलोड करुन छाननी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, अशा उमेदवारांना पदभरती परीक्षेसाठी अपात्र समजण्यात येईल, अशी सूचना एस एम एस द्वारे तसेच विभागाकडून देण्यात आलेली होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निवृत्तीवेतन धारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत ह्यातीचे दाखले सादर करावे

Thu Nov 17 , 2022
नागपूर :- नागपूर येथील कोषागार कार्यालया अंतर्गत निवृत्तीवेतन घेणा-या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांचे कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे ह्यातीचे दाखले नोव्हेंबर महिन्यात कोषागारात सादर करण्यात येतात. त्यानुसार सर्व निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचे दाखले 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत बँकेत सादर करावे. ज्या कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे वय 80 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्यांनी आपल्या वयाचा पूरावा म्हणून स्वत:चे आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com