नागपूर :- दुर्गम भागातील गोरगरीब मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी उच्च शिक्षण घेऊन कुटुंब व गावाचे नाव उंचविण्याच्या स्वप्नाला पंख देण्याचे कार्य ‘मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून घडत आहे. याचा अनुभव रामटेक तालुक्यातील पेंच अभयारण्य परिसरातील सिल्लारी या अत्यल्प लोकवस्तीच्या गावात राहणाऱ्या धनश्री मरसकोल्हे यांनी कथन केला.
दुर्गम गावापासून बऱ्याच लांब असलेल्या नागपूर येथे पॅरामेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या धनश्रीला रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेच्या लाभाचे 3 हजार रुपये बँक खात्यात आल्याचा मॅसेज मोबाईलवर बघितला व या आनंदाच्या दिवशी आनंदात आणखी भर पडली. अभ्यासासाठी विविध पुस्तकांची यादी तयारच होती मात्र पैशाअभावी पुस्तक खरेदी तेवढी होत नव्हती. आता या योजनेतून पैसे मिळाले आणि आवश्यक पुस्तके खरेदी करुन अभ्यासाला गती दिली, असे निरागस पण विश्वासपूर्ण शद्ब धनश्री उच्च्रत असतांना मुलींनाही ध्येय प्राप्तीच्या दिशेने पुढे जाण्यासाठी या योजनेमुळे लाभ होत असल्याचे दिसून आले. याकरिता धनश्री यांनी मुख्यमंत्राचे मनापासून आभार मानले व अशी मदत कायमस्वरूपी असावी, या भावनाही व्यक्त केल्या.