कोदामेंढी :- येथून जवळच असलेल्या अडेगाव येथे जिल्हा परिषद आरोग्य विभाग नागपूर तर्फे भव्य मोफत तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या शिबिरामध्ये नेत्ररोग तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, सामान्य रोग ,तज्ञ दंतरोग तज्ञ यांच्याकडून तपासणी होणार असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र समोर लावलेल्या मोठ्या बॅनर मध्ये नमूद होते. मात्र भव्य मोफत या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांसह आधुनिक उपकरणांच्या अभाव जाणवला तर महागडे अमॉक्सक्लेव 625 या अँटिबायोटिकच्या तालुक्यातील फक्त 425 रुग्णांनी लाभ घेतला तरी तुटवडा झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नुकतेच जि प. आरोग्य विभाग नागपूर तर्फे तालुक्यातील भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन अडेगाव(पटाचा) येथे करण्यात आले होते. शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी होणार असल्याचे बॅनर मध्ये नमूद होते .मात्र तालुक्यातील फक्त 451 रुग्णांनी लाभ घेतलेल्या या मोफत शिबिरात महागड्या एमॉक्सक्लेव 625 या खाजगी दुकानात 15 ते 20 रुपयाची प्रत्येकी एक गोळी किंमंत असण्या अँटिबायोटिक तुटवडा झाला. भंडारा येथील इंद्राक्षी आय हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर न येता त्यांच्या ऐवजी त्यांच्या टेक्निकल चमुनेच डोळे तपासले .भंडारा येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. डांगे शिबिराची वेळ दहा ते दोन वाजेपर्यंत फक्त चार तासाची असताना शिबिरात साडेबारा वाजता दरम्यानच जेवण सुरु झाल्याने जेवण आटोपताच ते साडेबारा वाजताच निघून गेले असे तेथे उपस्थित प्रा. आ केंद्र कोदामेंढी च्या कर्मचाऱ्यांनी सांगितले .
मौदा ग्रामीण रुग्णालयाची दंतरोग तज्ञ म्हणून डॉक्टर कापसे यांनी आधुनिक उपकरणाची साधने न आणता फक्त टार्चनेच दंत रुग्णालयाची तपासणी केली . मौदा ग्रामीण रुग्णालयाचे बालरोग तज्ञ डॉ. गजभिये यांनी सुद्धा बालकांची तपासणी अशाच प्रकारे केली असेल असे जाणवते तर सामान्य रोग तज्ञ म्हणून आरोग्य सेविका निशा तायडे यांनीच सामान्य रुग्णांची तपासणी केली. तपासणी झाल्यानंतर औषध घेण्यासाठी रुग्ण फार्मासिस्ट कडे गेले असता तेथे खाजगी दुकानात स्वस्त मिळणाऱ्या औषधी मुबलक प्रमाणात होत्या व ते रुग्णांना देतही होते, मात्र महागड्या अमॉक्सक्लेव 625 या अँटिबायोटिकच्या तुटवडा असून कोदामेंढी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन ते उद्याला घेऊन जावे असे फार्मासिस्ट तालुक्यातील आलेल्या रुग्णांना सांगत होते.त्यामुळे येथे आलेले अनेक रुग्णांनी नाराजी व्यक्त केली. हे तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्याचे शिबिर आहे की ,प्राथमिक आरोग्य केंद्रातील नियमित होणारी सामान्य तपासणी ?असा संतप्त सवाल त्यांच्या मनात तेथील वातावरण पाहून निर्माण झाला.
आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागपूर व जिल्हा आरोग्य समिती यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश देशमुख जिल्हा सदस्य जिल्हा परिषद नागपूर अरोली- कोदामेंढी सर्कल अंतर्गत अडेगाव येथे भव्य मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .या कार्यक्रमाचे उद्घाटन अनिल बुराडे सदस्य पंचायत समिती मौदा यांचे शुभ असते, योगेश देशमुख सदस्य जिल्हा परिषद नागपूर यांचे अध्यक्षतेखाली, दीपक गेडाम सदस्य पंचायत समिती मौदा, मंदा राखडे सरपंच ग्रामपंचायत अडेगाव तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य गण यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडले. शिबिर पार पाडण्यासाठी डॉ. नंदेश्वर तालुका आरोग्य अधिकारी ,गणेश कुंभारे सहाय्यक ,डॉ. सारिका राऊत वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माण अधिकारी मयुरी, पठाण, प्रयोग तंत्रज्ञ वर्षा मेश्राम, खान, आरोग्य सहाय्यक लांजेवार, तळेकर,आरोग्य सेवक सेविका गेडाम ,नरांजे, वरठी , सीएचओ इशाखा कावळे, टीएचओ निलेश एमपीडब्ल्यू मून, डॉटाऑपरेटर चिमूरकर सह आरोग्य केंद्र कोदामेंढी, अरोली ,खात सह तालुक्यातील आशा स्वयंसेविका, कर्मचारी परिश्रम घेतांना दिसले.