नागपूर : आज रात्री 1.30 ते 2 च्या दरम्यान कळमना कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूर येथील मिर्ची गळ्यामध्ये अचानक आग लागल्यामुळे कास्तकार व व्यापारी यांचे करोडो रुपयाचे नुकसान झाले आहे. संजय वाधवानी, वसंत पटले यांच्या खळ्यात ही घटना घडली असून आगीमुळे कँन्टीनसुद्धा स्वाहा झाली. आज घटनास्थळी जाऊन समितीचे सचिव यगलेवाड यांच्यासोबत निरीक्षण केले. आशिया खंडातील सर्वात मोठ्या कृषिमंडीमध्ये सुविधेचा अभाव असल्यामुळे कास्तकारांचा माल जळून खाक होणे, शेतमाल पावसात भिजणे अशा घटना वारंवार होत असतात.
इतक्या मोठ्या मंडीत फायरची व्यवस्था नसणे दुर्भाग्यपूर्ण
तब्बल 110 एकडमध्ये पसरलेल्या या मंडीत कसल्याही प्रकारची व्यवस्था नसून व अन्य सुविधेचा अभाव मोठ्या प्रमाणात आहे. सुरक्षा गार्ड सुद्धा रात्रीला फिरत नसून कमी प्रमाणात असल्यामुळे त्यांची अडचण आहे. मंडीत अस्तित्वात असलेल्या समितीने मार्केटकडे दुर्लक्ष करून कोणताही प्रश्न सोडविलेला नाही व स्वत:च्याच कारभारात ते मस्त राहतात. कास्तकार व व्यापारी अडचणीत असून सुद्धा इलेक्ट्रिक बिल वसुली म्हणून रु.18/- प्रति युनिट प्रमाणे घेतात, याचे आश्चर्य वाटते. सचिवांनी सर्व ठिकाणी एम.एस.ई.बी.च्या बिलाप्रमाणेच बिल भरतील, अशाप्रकारची सूचना दिली असून ती मान्य केली आहे.
APMC ने तात्काळ भरपाई करावी
आगीमध्ये झालेल्या करोडो रुपयाचे नुकसान APMC ने आपल्या तिजोरीतून भरून द्यावे. कारण यांच्या नियोजनाच्या अभावामुळे हे नुकसान झाले आहे. सचिवांनी या सर्वांची दखल घेण्याचे मान्य केले आहे.
यावेळी आ. कृष्णा खोपडे यांचेसोबत माजी नगरसेवक प्रदिप पोहाणे, मिर्ची मार्केटचे अध्यक्ष महेश बांते, संजय वाधवानी, राजू लारोकर, वसंत देशमुख, रमेश उमाठे, विश्वबंधु गुप्ता, विनोद कातुरे, राजू आया, राहुल अग्रवाल, भोजराज कुर्झेकर, विशाल संचेती, अशफाक बानानी, घनश्याम आहुजा, अभिजित बानगडे, सुनिल सूर्यवंशी व अनेक व्यापारी आड्तीया उपस्थित होते.