छत्तीसगडच्या कुम्हाली संघ स्व.संजय नायडु ट्रॉफी विजेता

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

वेकोली गोंडेगाव खदान मैदानावर क्रिकेट स्पर्धेत २० राज्यातील संघ सहभागी. 

कन्हान : – वेकोली गोंडेगाव खुली खदान मैदानावर सनसुई क्रिकेट क्लब गोंडेगाव यांच्या वतीने तीन दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत छत्तीसगड च्या कुम्हाली संघाने अंतिम सामना जिंकत स्व.संजय नायडु ट्रॉफी विजेता ठरला .

स्व.संजय नायडु यांच्या स्मरणार्थ आयोजित स्पर्धेत विविध राज्यातील वीस संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरी सामना डीएनए कामठी विरूध्द अजनी इलेव्हन नागपुरचा झाला.ज्या मध्ये डीएनए कामठीच्या संघाने बाजी मारली. दुसरा उपांत्य फेरी सामना प्रतीक इलेव्हन विरूध्द छत्तीसगढ़ च्या कुम्हाली इलेव्हन मध्ये झाला. यात कुम्हाली इलेव्हनने बाजी मारली. स्पर्धेचा अंतिम सामना डीएनए कामठी विरूध्द कुम्हाळी संघामध्ये झाला. यात प्रथम फलंदाजी करताना कुम्हाळी संघाने ८ षटकात ९ गडी गमावित १०४ धावा केल्या. अमित यादवच्या १३ चेंडुत ३२ धावा आणि राजेश कुमारच्या ११ चेंडुत २८ धावांचा समावेश होता. १०५ धावांचा पाठलाग करतांना डीएनए संघ ८ षटकांत ४ गडी गमावुन केवळ ८७ धावाच करू शकला. अशा प्रकारे हा अंतिम सामना छत्तीसगढ़ च्या कुम्हाळी संघा ने जिंकत स्व.संजय नायडु ट्रॉफी विजेता ठरला .

पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष स्थानी वेकोलि गोंडेगाव उपक्षेत्रीय व्यवस्थापक राजेंद्र ठाकरे होते. याप्रसंगी रुद्र ट्रान्सपोर्टचे संचालक बंटी आकरे, टिपु सिंग, वरिष्ठ पत्रकार अजय त्रिवेदी, अनिल सिंग आदीं प्रामुख्याने उपस्थिती होते. यावेळी विजेत्या छत्तीसगड च्या कुम्हाली संघाला शिल्ड, विजेता चषक आणि रुद्र ट्रान्सपोर्टचे रोख ७१ हजार रूपये, तर उप विजेत्या डीएनए संघाला ५१,००१ रुपयांचे बक्षीस देण्यात आले. मॅन ऑफ द मॅच अमित यादव, बेस्ट मॅन नंदु बोरकर, बेस्ट बॉलर राकेश यादव, बेस्ट फिल्डर घनश्याम आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार छत्तीसगड च्या शोबीला मॅच मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात आला. स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता समिती सदस्य उमेश पाल, प्रीतम सिंग, रोहित डोंगरे, सतीश गुप्ता, अनुज कांबळे, गौरव भोयर, वैभव भोयर, जसवंत, अरविंद यादव आदीने सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचा आकस्मिक मृत्यु

Wed Dec 14 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नया गोदाम रहिवासी व मागील दहा वर्षांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्र मधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचा राहत्या घरातच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना दुपारी 3 दरम्यान घडली असून मृतकाचे नाव हरिदास चांदेकर वय 70 वर्षे रा कामठी असे आहे.मृत्यूचे कारण कीटकनाशक औषध प्राशन केल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com