५२ सेकंदात ३६ देशांच्या राजधान्या सांगितल्या..
रामटेक – रामटेक शहरातील मुळ रहवासी असलेले प्रवीण चांदेकर यांनी मुलगी कु. समन्वी प्रवीण चांदेकर, वय 2 वर्षे 7 महिने, राहणार पुणे. हिच्या नावाची सर्वात कमी वेळेत ५२ सेकंदात ३६ राजधान्या सांगणारे सर्वांत कमी वयाचे मुल म्हणून इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजी पुष्टी करण्यात आली असून दिनांक ३० डिसेंबर २०२१ रोजी तिच्या नावाची नोंदणी करण्यात आली आहे.
समन्वी चे वडील प्रवीण चांदेकर सॉफ्टवेअर इंजिनिअर असून आई सौ. शिल्पा प्रवीण चांदेकर असिस्टंट प्रोफेसर आहेत. लहानपणा पासूनच समंवी असाधारण,अलौकीक अशी एकपाठी बुद्धिमत्ता असलेले बाळ असल्याचे तिच्या आई – वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी तिची असाधारण क्षमता ओळखून तिला घरीच प्रशिक्षण दिले. समन्वी ने देखील त्यांना छान प्रतिसाद दिला.
या पूर्वी २ वर्षे २ महिन्यांची असताना तिचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंदवल्या गेले होते. समन्वी ला नवनव्या गोष्टी शिकण्याचे कुतूहल तशीच आवड देखील आहे. तिचे आजोबा लालाजी गायधनी ( निवृत्त प्राचार्य, रामटेक) यांनी नेहमीच तिला प्रोत्साहित केले.
समन्वीने येवढ्या कमी वयात एकापाठोपाठ एक मिळवलेल्या जागतिक सन्मानामुळे आज परिवारातील सर्वांचा आनंद द्विगुणित झाला असून सर्वांना तिचा सार्थ अभिमान आहे……समन्वीला आतापासुन अनेक नव्या गोष्टी शिकण्याची आवड आहे तिचे आजोबा लालाजी गायधनी सेवानिवृत्त प्राचार्य समर्थ कनिष्ठ महाविद्यालय हे तिला प्रोत्साहित करीत असतात “तीने ऐवढया कमी वयात हा सन्मान मिळविल्या बद्दल आम्हाला तिचा अभिमान वाटतो आहे असे समनवीचे आजोबा समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य लाला गायधनी यांनी सांगितले. समन्वीचे सर्वत्र कौतुक होत आहे…