– दक्षिण नागपुरात बसपाचा मेळावा संपन्न
नागपूर :- बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाला शासक बनण्यासाठी संघटितरित्या प्रयत्न करायला सांगितले होते. बहुजन समाजाकडे 85% मते आहेत, परंतु त्यांनी आपल्या मतांची शक्ती ओळखली नाही त्यामुळे बहुजन समाज हा शासक बनण्याऐवजी याचक बनला. यातील अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीयांनी आपल्या मतांची ताकद ओळखून संघटन व शक्ती बनवुन शासक बनावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश बसपाचे केंद्रीय कॉर्डिनेटर भीम राजभर यांनी केले.
भीम राजभर हे दक्षिण नागपूर विधानसभा स्तरीय संघटन समीक्षा व कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. पवार विद्यार्थी सभागृहात झालेल्या संघटन समीक्षा व कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश बसपाचे प्रदेशाध्यक्ष ऍड संदीप ताजने व प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश बसपाचे प्रभारी व विदर्भाचे इन्चार्ज ऍड सुनील डोंगरे हे होते.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव रंजना ढोरे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, माजी प्रदेश सचिव उत्तम शेवडे, माजी मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, जिल्हा महिला आघाडीच्या नेत्या सुरेखा डोंगरे यांनी मार्गदर्शन केले.
मंचावर शहर प्रभारी विकास नारायणे, शहर उपाध्यक्ष उमेश मेश्राम, जिल्हा महिला महासचिव सुनंदा नितनवरे, माजी शहराध्यक्ष राजू चांदेकर, माजी नगरसेवक सागर लोखंडे, रामप्रसाद चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष व दक्षिण नागपूरचे इन्चार्ज अमित सिंग यांनी, संचालन दक्षिण नागपूर विधानसभेचे प्रभारी नितीन वंजारी यांनी तर समापन दक्षिण नागपूर विधानसभेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निरंजन जांभुळे, वर्षा वाघमारे, शंकर थुल, विलास मून, चंद्रशेखर कांबळे, संभाजी लोखंडे, धनराज हाडके, राष्ट्रपाल पाटील, जगदीश गेडाम, हेमंत बोरकर, सहदेव पिल्लेवान, संजय सोमकुवर, बालचंद्र जगताप, संगीत इंगळे, अशोक रंगारी, ज्ञानेश्वर बांगर, जय डांगे, कविता लांडगे, सविता बागडे, संगीता कडबे, विमल वराडे यांनी विशेष परिश्रम घेतले.