– माळी समाजाला काँग्रेस कडून सन्मान
नागपूर :- काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले, माजी मंत्री आमदार सुनील केदार, माजीमंत्री नितीन राऊत, मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, खा.श्याम कुमार बर्वे, खा.सतेज पाटील, आदींच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस मध्ये नुकतेच प्रवेश केलेले माळी समाजाचे नेते किशोर कन्हेरे यांची आज काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली आणि सन्मान केला.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माळी समाजाचे मोठे मतदान असल्याचे पाहता किशोर कन्हेरे यांच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी झालेल्या नियुक्तीचे राज्यभरातून स्वागत करण्यात आले.
एकट्या विदर्भात माळी समाजाचे जवळपास बावीस लाखाचे मतदान आहे. माळी तेली आणि कुणबी या समाजात किशोर कन्हेरे लोकप्रिय असल्यामुळे विदर्भातील या सर्व समाजात त्यांच्या नियुक्तीने समाजाला न्याय मिळाल्याची भावना आहे. किशोर कन्हेरे यांनी काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष पदी केलेल्या नियुक्तीबद्दल सर्व प्रमुख नेत्यांचे आभार मानले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वातील माळी तेली कुणबी आदी समाज संस्थांद्वारे महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा देण्यात येणार असल्याचे जाहीर करून महाराष्ट्रभर प्रचार करून काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला सत्तेत आणण्यासाठी प्रयत्नांची परकाष्ठा करू असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला आहे.