खापरखेडा येथे शिवालयात शिवजनमोत्सव साजरा

आकाश राऊत

खापरखेडा प्रतिनिधी – खापरखेडा येथे शिवसेना कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तिथीप्रमाणे) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी छत्रपति शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्ज्वलन करण्यात आले तसेच शिवरूद्र ढोल ताशा पथक यांच्या तर्फे मानवंदना देण्यात आली. व भव्य रक्तदान व रोग निदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी खासदार कृपाल तुमाने, शिवसेना जिल्हा प्रमुख राजू हरणे, युवासेना विदर्भ सचिव हर्षल काकडे, पंचायत समिती सभापती अरुणाताई शिंदे, सरपंच पुरुषोत्तम चांदेकर, उपजिल्हा प्रमुख अशोक झिंगरे, अमर जैन, अशोक वंजाळ, राहुल तिवारी, रतन ठाकुर, सावनेर तालुका प्रमुख नरेंद्र मोरे, उपतालुका प्रमुख शंकरभाऊ काकडे, माजी तालुका प्रमुख सुरेश केने आदी व शिवसेना पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशवितेसाठी सचिन गजभीये, शुभम झींगरे, प्रकाश बाळापुरे, राजू बर्वे, सुनील भोतकर, विकास बारई, दिनेश सपाटे, अनिल बावनकुले, श्रीकांत खापरे, योगित भोतकर, ललित श्रीवातस्व, अरविंद लोखंडे, युवा सेना सावनेर तालुका बाळासाहेब काकडे शिवसैनिक व शिवभक्तानी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पत्रकार दिलीप मेश्राम यांना समाज रत्न पुरस्काराने सम्माणीत

Wed Mar 30 , 2022
-सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांचे हस्ते दिला पुरस्कार कामठी ता प्र 30:-टिळक पत्रकार भवन सीताबर्डी नागपूर येथे 27 मार्च ला भोई गौरव मासिकाद्वारे आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्त न्यायाधीश व मागासवर्गीय आयोग सदस्य चंद्रलाल मेश्राम यांचे हस्ते व यवतमाळ च्या उपजिल्हाधिकारी स्नेहल कणीचे,प्रख्यात साहित्यिक ज्ञानेश वाकुडकर,जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके,प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राध्यापक डॉ. श्रीकृष्ण ढाले, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com