– मुख्य आरोपीसहीत दोघांची जेलात रवानगी,आता पर्यंत ७ देशी बंदूका व आरोपीस अटक
खापरखेडा :- खापरखेडयातच नव्हे तर मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रभर बंदूकिचा वापर, गोळी फायर करने व बंदूका बाळगण्या सारखे गुन्हे घडत असल्याने पोलीसां समोर मोठे आव्हान ठरले होते त्या अनुषंगाने नागपुर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी आर्म एक्ट ची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आणि खापरखेडा पोलिसांनी कोबीग ऑपरेशन करून रिकॉड वरुन आरोपींचा तपास केला त्याच दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी व खापरखेडा पोलीस निरीक्षक यांनी एक पोलीस पथक तैयार करून आर्म एक्टच्या कार्यवाहिचे निर्देश दिले डी बी पथक पेट्रोलिंग व आरोपींचा शोध किरीत असतांना वारेगाव परिसरातील मछिंदरनाथ मंदिरा जवळ एक व्यक्ती संशयीतरित्या फिरतांना दिसून आला तो कंबरेतुन काहीतरी फेकत असल्याने त्याला साफळा रचुन ताब्यात घेऊन विचासरपुस व अंगझडती घेतली असता देशी कट्टा मिळून आला तपासा दरम्यान आरोपी सोहेब अब्दुल खान रा. कामठी कॉलनी न.३ याने देशी कट्टा हा त्याचा मित्र कन्हान कान्द्री येथील आशीष यादव याने उत्तरप्रदेशातील आजमगङ येथील लोचय बल्ली यादव नामक व्यक्ती यांच्या कडून विकत आणल्याचे कबूल केले यावर खापरखेडा पोलीस डी बी पथक यांनी कन्हान कान्द्री येथून आशीष यादव यास अटक करून उत्तरप्रदेशातील टोटवा ठाना महाराजगंज जिल्हा आजमगड येथे जाऊन देशी कट्टे विकनारा मुख्य आरोपी लोचय यादव यास अटक करुन तिघेही जेलात गेले आहेत पुढील तपासा खापरखेडा पोलीस करीत आहे.
आता पर्यंत ७ देशी बंदूका जप्त केल्या आहेत तर अनेक गुह्यात सर्व आरोपीना अटक झाली आहे ज्यात बंदूकीचा वापर, गोळी फायर करने,वाहन चोरी, घरफोडी, खून व खुनाचा प्रयत्न , चोरी यासारख्या गुह्यतील आरोपींना अटक केल्याने खापरखेडा परिसरात पोलिसाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ,उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड व पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे डी बी पथकाचे प्रफुल राठोड, शैलेश यादव,कविता गोंडाने,मुकेश वाघाडे, राजू भोयर,राजकुमार सातुर यांच्या पथकांनी केली.