खंडाळा (घ) ला अतिवृष्टी मुळे शेत पिकाचे मोठे नुकसान.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  

जिल्हा कृषी अधिक्षक रवींद्र मनोहरे यानी नुकसास भागास भेट देत सर्वेक्षणाचे दिले आदेश.

कन्हान : – पासुन जवळच असलेल्या खंडाळा (घटाटे) परिसरात रात्री ला जोरदार पाऊस पडुन शेतात पावसाचे पाणी साचुन वाहत जाताना शेत जमिन खरडुन गेल्याने शेतात लावलेल्या शेत पिकाचे भयंकर नुकसान झाले आहे. जिल्हा व तालुका कृषी अधिका-यानी भेट देऊन नुकसानीचा सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
नागपुर जिल्हा व पारशिवनी तालुक्यातील खंडाळा (घटाटे) भागात बुधवार (दि.२६) ला रात्री जोरदार पाऊस पडल्यामुळे परिसरातील शेतातील सोयाबीन, कापुस, तूर, धान व इतर पिकाचे नुकसान झाले आहे. सोबतच जमीन खरवडुन गेली आहे. पारशिवनी तालुक्यात गेल्या २४ तासात १४२ एम एम पाऊस झाल्याची सरकारी विभागाने नोंद घेतली आहे. या अतिवृष्टी ची सूचना कृषी विभागाला देण्यात आल्याने माहिती मिळताच जिल्ह्याचे कृषि अधिक्षक रवींद्र मनोहरे हयानी तात्काळ नुकसान ग्रस्त शेत शिवारात स्वत: जाऊन पाहणी केली आणि झालेल्या नुकसानीचा सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी सुरज शेंडे, शेतकरी नेते संजय सत्येकार, खंडाळा (घ) उपसरपंच चेतन कुंभलकर, कृषी मीत्र प्रफुल नागपुरे, कृषी सहायक विवेकानंद शिंदे, विभा गातील संबंधित अधिकारी व पिढीत शेतकरी सह इतर शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भुमी पुजनाचं कार्यक्रम समारंभ संपन्न..

Thu Jul 27 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी – दिनांक 23.07.2023 परमात्मा एक व्यसन मुक्ती चर्चा स्थळ सातगाव या ठिकाणी परमात्मा एक चे वर्षातून मोठ मोठे कार्यक्रम पार पडतात व या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यसमुक्तीच्या आधारावर मार्गदर्शन होत असते, याठिकाणी भवनाची जागा कमी पडत असल्यामुळे त्याकरिता खासदार कृपालजी तुमाने, रामटेक लोकसभा क्षेत्र, साहेबांनी सभा मंडप बांधकामाकरीता 10,00,000 (दहा लक्ष रुपये) निधी मंजूर केला आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com