रामटेक :- कविकुलगुरू कलिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथील शिक्षकेतर सेवक संघ तर्फे विवीध मागण्यांचे संदर्भात ,
विद्यापीठ व प्रशासनाला निवेदन देऊन, औजार बंद ठिय्या आंदोलन कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ ,
शिक्षकेतर सेवक संघ चे अध्यक्ष राजीवरंजन मिश्रा यांच्या नेतृत्वात कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांद्वारे लाक्षणिक रित्या सुरू करण्यात आले.
संयुक्त कृती समितीमार्फत विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विद्यापीठा समोर, संपावर बसून संप सफल केला असून
संघटनेमार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील महाविद्यालय कर्मचारी संघटना आणि विद्यापीठ संघटना, मागासवर्गीय संघटना या सर्व संघटनांनी या संपाचे आयोजन केले . उर्वरित पदांनाच सातवा वेतन आयोग लागू करणे , 58 महिन्यांची थकबाकी मंजूर करणे,रद्द केलेले आश्वासित प्रगती योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे ,पाच दिवसांचा आठवडा मंजूर करणे,नवीन दहा वीस तीस आश्वासित योजना लागू करणे इत्यादी मागण्या असल्याचे सांगितले.
संपात कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ चे
शिक्षकेतर सेवक संघ चे अध्यक्ष राजीवरंजन मिश्रा , ऑफिसर्स फोरम चे अध्यक्ष कैलाश मून,
विजय जामनकर ,नरेंद्र रहाटे , प्रवीण कळंबे, राजेश चकिनारपुवार , सुशील वैद्य , श्रियाद अभ्यंकर ,संजय वाते, सुनील बावणे , रुपेश मेश्राम , राजेंद्र मेश्राम , महेश येयेवार , राजेश दारोडे , अतुल गाडे ,प्रगती ढेपे, नलिनी हंगळे ,नंदिनी बंड , विनोद बागडे , योगेश चौधरी , कृणाल कनिखर , डॉ उमेश शिवहरे, सुमित कठाळे आदी एकत्ररित्या
विश्वविद्यालयाच्या मुख्य द्वारासमोर लाक्षणिक संपात सहभागी झाले होते.