अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहार नसल्याने आहार शिक्षक पुरवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शासनामार्फत पोषण आहार पुरवठा शाळेत पोहचल्या नसल्याने शाळेतील मुख्याध्यापक व शालेय शिक्षण समीतीचे अध्यक्ष शाळेकरी मुलांना आपल्या जवळील पैसे खर्च करून आहार देत आहेत मागील काही दिवसापासून पोषण आहार संपला असुन शासनाकडून पुरवठा करण्यात आला नाही.वरिष्ठ अधिकारी यांच्या विचारले असता लवकर पुरवठा होणार असल्याचे सांगितले आहे.