मुंबई :- ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, संपादक, समीक्षक आणि समालोचक वि. वि. करमरकर यांच्या निधनाबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी दुःख व्यक्त केले आहे.
करमरकर सच्चे क्रीडा प्रेमी, उत्कृष्ट क्रीडा पत्रकार व मराठी समालोचन क्षेत्रातील आघाडीचे व्यक्तिमत्व होते. स्वातंत्रोत्तर काळातील राज्याच्या एकूणच क्रीडा विकासाच्या मोठ्या कालखंडाचे ते अभ्यासू साक्षीदार व भाष्यकार होते. राज्यातील क्रीडा पत्रकारितेचा इतिहास त्यांच्या बहुविध योगदानाचा समावेश केल्याशिवाय अपूर्ण राहील, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.