कन्हान ते शिर्डी साई पालखी पदयात्रेचे प्रस्थान

साई भक्तांनी फुलाच्या वर्षाव, शरबत, फळ , पानी बॉटल वाटप करून केले भव्य स्वागत. 
 
कन्हान : – श्री साई पालखी सोहळा समिती कन्हान द्वारा १२ व्या वर्षी श्रीराम नवमी उत्सवा निमित्य कन्हान ते शिर्डी साई पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असुन श्री साई मंदीर इंदिरा नगर कन्हान येथे महाआरती व प्रसाद वितरण करून साई पालखी पदयात्रा काढण्यात आली. रस्त्यात विविध ठिकाणी साई भक्तांनी फुलाच्या वर्षाव, फळ , शरबत व पाणी बॉटल वितरित करून भव्य स्वागत करून हर्षोल्लोहासात पदयात्रेचे शिर्डी करिता प्रस्थान करण्यात आले.
     शनिवार (दि.२़) एप्रिल २०२२ ला श्री साई पालखी सोहळा समिति कन्हान द्वारा १२ व्या वर्षी श्रीराम नवमी उत्सवा निमित्य कन्हान ते शिर्डी साई पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. साई मंदीर इंदिरा नगर कन्हान कमेटी पदाधिका-यांच्या हस्ते पुजन, महाआरती व प्रसाद वाटप करून पदयात्रा सुरूवात करित शहिद चौक, तारसा रोड चौक भ्रमण करून नागपुर- जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर आली असता जवाहर नगर येथे सामाजिक कार्यकर्ता सुरेश कळंबे व मीना कळंबे यांनी फुलाच्या वर्षाव, पाणी बॉटल वितर ण करून भव्य स्वागत केले. आंबेडकर चौक येथे संजीव दिपपती, अशोक पाटील व मित्र परिवार द्वारे शरबत व फळ वितरण करून हर्षोल्लोहासात स्वागत केल्यावर साई पालखी पदयात्रेचे कामठी मार्गे शिर्डी करिता प्रस्थान करण्यात आले. याप्रसंगी सर्व साई भक्त व परिसरातील गावकरी नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

तामगाडगे चॅरीटेबल ट्रस्टचे सिकलसेल ग्रस्तांसाठी जनजागृती अभियान बुधवारपासून

Mon Apr 4 , 2022
-बोन मॅरो ट्रान्सप्लांटद्वारे कायम निदानाबाबत डॉ. गौरव खेरे व डॉ. दीप्ती जैन यांचे मार्गदर्शन -विदर्भातील सिकलसेल ग्रस्तांसाठी ‘एसएमटीसीटी‘चा अभिनव उपक्रम नागपूर  वंचित घटकांमध्ये सर्वाधिक आढणारा सिकलसेल आजार हा आनुवंशिक रक्तदोशातून होत असतो. नागपूरसह विदर्भात सर्वाधिक आढळणार्या या आजराबाबत हवी त्याप्रमाणे जनजागृती न झाल्याने आतापर्यंत या आजारावर निर्बंध घालता आले नाही. मात्र, आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट (बीएमटी) द्वारे या आजारातील ग्रस्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com