संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– एकुण ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.
कन्हान :- कन्हान स्टेशन अंतर्गत खंडाळा शिवारातील वाघधरे वाडी परिसरात गोवंश जनावर अज्ञात इसमांनी कत्तली करिता घेऊन जाण्याचा उद्देशाने बांधुन ठेवले असल्याने पोलीसांनी ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवार (दि.२१) मे ला सकाळी ६.३० वाजता दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर, सतिश फुटाणे, निखिल मिश्रा, सम्राट वनपर्ती, आशिष बोरकर, दिपक कश्यप सह पोलीस कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करित असतांना माहिती मिळाली कि, अज्ञात इसमांनी खंडाळा शिवारातील वाघधरे वाडी येथे अमित धनराज घारड यांचा शेतालगत कत्तली करिता घेऊन जाण्याचा उद्देशाने गोवंश जातीचे जानावरे अत्यंत निदर्यतेने बांधुन ठेवली आहे.
अश्या माहिती वरुन पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पाहणी केली असता एका झाडाला लांब दोरीच्या सहायाने अत्यंत निदर्यतेने बांधलेले गोवंश जातीचे जानावरे दिसुन आल्याने पोलीसांनी ३७ जानावरे किंमत ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन चारा पाणी आणि सुरक्षतेसाठी ज्ञान फाउंडेशन गोशाळा खरबी येथे दाखल करण्यात आले. सरकार तर्फे फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर यांचा तक्रारी वरून कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, कन्हान पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर, सतिश फुटाणे, निखिल मिश्रा, सम्राट वनपर्ती, आशिष बोरकर, दिपक कश्यप सह आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.